शिवसैनिकांनी कोकाटेंच्या अंगावर पत्ते फेकले

अधिवेशनात जंगली रमी खेळल्याचा निषेध करीत शिवसैनिकांनी मंगळवारी नाशिकरोड येथे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अंगावर पत्ते फेकले. यावेळी पोलीस आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची पळापळ झाली.
नाशिकरोड भागातील दुर्गा गार्डन परिसरात सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सरोज आहिरे यांनी छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. येथे मंत्री माणिकराव कोकाटे आले. हे कळताच संतप्त शिवसैनिक तेथे पोहोचले. ‘शेतकर्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून अधिवेशनात जंगली रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा धिक्कार असो’, ‘राजीनामा द्या, राजीनामा द्या, माणिकराव कोकाटे राजीनामा द्या’ अशी घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी कोकाटे यांच्या अंगावर पत्ते फेकले. या आंदोलनाने पोलीस व अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची पळापळ झाली.
कृषीमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या सिन्नरच्या पंचाळे येथील मी रहिवाशी आहे. शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले असतानाही मंत्री तेथे फिरकले नाही, ते रमी खेळण्यात रमले असल्याने त्यांना पत्ते दिले, असे यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अस्लम (भैया) मणियार यांनी सांगितले. त्यांच्यासह योगेश देशमुख, नीलेश शिरसाट यांना पोलिसांनी ताब्यात घेवून नंतर सोडून दिले.
शिव सेनिक्स फेकणे कार्डे वर मंत्री करू शकत नाही मध्ये नाशिक ओव्हर 'जंगल रमी' पंक्ती
शिव सेना कामगार निषेध द्वारा फेकणे खेळत आहे कार्डे वर शेती मंत्री मॅनिप्रारा करू शकत नाही मध्ये नाशिक, आरोप तो खेळला 'जंगल रमी' दरम्यान असेंब्ली सत्रे? पोलिस आणि एनसीपी कामगार होते पकडले बंद संरक्षक?
Comments are closed.