आपल्यासोबत घात नाही, विश्वासघात झालाय; लेकाच्या भाषणातील शब्द ऐकताच भास्कर जाधवांना अश्रू अनावर
रत्नागिरी : राज्यात गेल्या काही महिन्यात चांगल्याच राजकीय घडामोडी घडत असून विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना पक्षांतराचे वेधच लागल्याचं दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षात नेत्यांचे प्रवेश वाढत आहेत. शिवसेना (Shivsena) ठाकरे गटालाही मोठा फटका बसत असून नाशिकमधील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता, कोकणातीलही पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात शिवसेना नेते आणि स्वदेशी भास्कर (भास्कर जाधव) जाधव यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. मुलगा विक्रांत जाधव यांचे भाषण सुरू असताना वडिल भास्कर जाधवनांना अश्रू अनावर झाले होते. यापूर्वीही भास्कर जाधव यांना एका मेळाव्यात अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव पुन्हा एकदा भावनिक झाल्याचं दिसून आलं. मुलगा विक्रांत जाधव यांचे भाषण सुरू असताना भास्कर जाधव यांचे डोळे पाणावले, कंठ दाटल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. यावेळी, आपल्यासोबत घात नाही, विश्वासघात झालाय असे मुलगा विक्रांत यांनी म्हणताच भास्कर जाधवांचा कंठ दाटला, त्यांनी समोरील टॉवेलने आपले डोळे पुसले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर आणि जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांनी भास्कर जाधव यांची साथ सोडल्यानंतर भास्कर जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेना उबाठा पक्षाचा वेळणेश्वर येथे मेळावा होत आहे. या मेळाव्यात भाषण करताना मुलगा विक्रांत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी, मुलाच्या भाषणणावेळी भास्कर जाधव पुन्हा एकदा भावनिक झाले होते. यापूर्वी देखील भास्कर जाधव शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा होती, महाविकास आघाडीत मंत्रिपदाची संधी नाकारल्याने भास्कर जाधव नाराज होते. दरम्यान, जाधव यांच्या पक्षांतराची चर्चा जोर धरत असताना, यापूर्वीच्या एका मेळाव्यात त्यांचे डोळे पाणावले होते.
मोलकरणीची पाठवणी करतानाही अश्रू
भास्कर जाधव यांच्याकडे घरकाम करणाऱ्या सुप्रियाचे मे महिन्यात लग्न होते, त्यासाठी सर्व कार्यक्रम पुढे ढकलून आमदार जाधव हे पत्नी, मुले, पुतणे, सुनांसह लहानशा पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले. लग्न लागलं.. सात फेरे झाले. त्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा भास्करराव जाधव यांचा कंठ दाटून आला. सुप्रियाने पत्नी सौ. सुवर्णाताई आणि सून सौ. स्वरा यांना कडकडून मिठी मारली आणि ती रडू लागली. आपुलकीच्या नात्यांमधून तयार झालेल्या या प्रेमाचा हळवा क्षण पाहताना उपस्थितांचेही डोळे पाणावले. तेव्हा, सुप्रियाला बापाचं प्रेम देणाऱ्या भास्कर जाधवांच्याही अश्रूंचा बांध फुटला.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.