मिंध्याची धूळफेक आता उघड होतेय आणि त्यांची लाचारीही दिसून येतेय; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

मुंबईतील मातोश्री मध्ये इथर काही पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आपण तेजाची मशाल घेत पुढे जात आहोत. ही तेजची मशालीत सर्व जळमटे, विरोधक भस्त होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजप, मिंधे, अजित पवार गटातले अनेकजण आता शिवसेनेत येत आहेत. तसेच दिशाभूल झाल्यामुळे काहीजण शिवसेनेतून बाहेर गेले होते, तेदेधील आता परत येत आहेत. त्या सर्वांचे आपण स्वागत करत आहोत. धूळफेक करत काही शिवसैनिकांना त्यांच्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, आता सर्व धूळफेक उघड होत आहे. वातावरणात आणि राजकारणात प्रदूषण आहेच, पण आता त्यांची धूळफेक स्पष्ट होत आहे.

गद्दारी करताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, असे कारण दिले होते. काँग्रेससोबत गेले होते, असे कारण दिले. मात्र, भाजपच्या मंत्रिमंडळात आपण राहू शकत नाही, त्यासाठी राजीनाम्याची तयारी दाखवणाराही आपण पाहिला आहे. त्यानंतर अजित पवार निधी देत नसल्याने यांच्यासोबत काम करू शकत नाही, असे कारण देण्यात आले. मात्र, आता ते अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसत आहे. तसेच त्यावेळी भाजपने विश्वासघात, दगाबाजी केली, त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण महाविकास आघाडी स्थापन केली.

आता नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या पोस्टरवर सोनिया गांधीचे छायाचित्र आहे. यामुळे त्यांची सर्व लाचारी सत्तेसाठी आहे, हे दिसून येते. आता त्यांना भाजपत काही किंमत नाही. फक्त नंबर एकला महत्त्व असते. नंबर दोनला काहीच महत्त्व नसते, असे भाजपवाले सांगत आहेत. शिवसेनेचा आजही ठाण्यामध्ये दरारा आहे. मात्र, भाजप कार्यकर्ते मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करतात आणि ते काहीही करू शकत नाही. याला लाचारी नाही तर काय म्हणायचे, असा सवालही त्यांनी केला.

ठाणे हा आपला शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो अबाधित राहिला पाहिजे. तसेच आपली मशाल धगधगत राहायला हवी आणि भगव्याचे पावित्र्य कायम ठेवले पाहिजे. काहीजण भगव्या रंगावर वेगवेगची चित्रे, पोस्टर लावत जनतेची दिशाभूल करत आहेत. आपली भगव्याची हिंदुत्वाची मशालच आहे. ही शिवसेनाप्रमुखांची तेजाची मशाल आपण पुढे घेऊन जाऊ. या मशालीच्या तेजीने सर्व जळमटे, विरोधक भस्म होतील, असा आपला विश्वास आहे, असे ते म्हणाले.

Comments are closed.