ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
मुंबई : राज्यात नगरपालिका निवडणुकांसाठी (Election) मतदान झाले असून शेकडो नगराध्यक्ष आणि हजारांहून अधिक नगरसेवकांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. आता, सर्वांनाच उत्सुकता आहे ती 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालाची. नगरपालिका निकालानंतर राज्यात पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना कंटाळा आला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज महाराष्ट्रातील पक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुखांची मुंबईतील शिवसेना भवन येथे बैठक घेतली. त्यामध्ये, स्थानिक राजकारणात शिवसेनेची (Shivsena) तयारी आणि मनसेसोबतच्या युतीवरही भाष्य केलं. दरम्यान, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारात उद्धव ठाकरे उतरले नसल्याचं पाहायला मिळालं.
जिल्हा परिषद पंचायते समिती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांची जिल्हा संपर्कप्रमुखांसोबत शिवसेना सेना भवन या ठिकाणी बैठक पार पडली. यावेळी त्यांनी सर्वच जिल्हा संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन केले. पंचायत समिती जिल्हा परिषद गट आणि ऑर्डर यामध्ये पक्षाचे उमेदवार मजबूत आहेत का? सोबत महाविकास आघाडी म्हणून तो उमेदवार सर्वाना पसंत आहेत का? ऑर्डर आणि गटाची ताकद किती? त्यात मनसेची ताकद किती? या सर्व बाबींचा आढावा घेण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी जिल्हा संपर्क प्रमुखांना केल्या आहेत.
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानेही उद्धव ठाकरेंनी चर्चे केली. त्यामध्ये, महापालिकेतील प्रभागात सध्याचा नगरसेवक कोणता? त्या विभागात आपली किती आहे, तसेच महाविकास आघाडी म्हणून कुठला उमेदवार सक्षम यासंदर्भातील आढावा घेऊन एक अहवाल द्या सादर करण्याचे बजावले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर झालेल्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्याचेही उद्धव ठाकरेंनी सूचवलेजमीन लेव्हलला आपले पदाधिकारी व शाखाप्रमुख कोण आहेत? किती जागा रिक्त आहेत आणि त्यांचे कार्य क्षेत्र काय, कुठे काम करत आहेत? या सर्व बाबींचा देखील आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील उद्धव ठाकरेंनी जिल्हा संपर्कप्रमुखांना केल्या आहेत.
नगरपालिका निवडणूक प्रचारात ठाकरेंची अनुपस्थिती
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाने स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवली होती. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 पेक्षा जास्त सभा घेत महाराष्ट्र पिंजून काढला. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनीही शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार केला. मात्र, या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे कुठेही दिसून आले नाहीत. त्यामुळेही त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे.
हेही वाचा
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दैव बलवत्तर म्हणून बचावले कुटुंब; कारची राखरांगोळी, सीसीटीव्हीत थरार
आणखी वाचा
Comments are closed.