AUS vs ENG: ऍशेस पूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! जखमेमुळे पर्थ कसोटीमधून स्टार अष्टपैलू खेळाडू बाहेर
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात 21 नोव्हेंबरपासून सुरू होणार ऍशेस मालिकेचा पहिला सामना पर्थमध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियन संघासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (Josh hazelwood) पहिल्या टेस्टसाठी फिट झाला आहे, मात्र स्टार अष्टपैलू शॉन एबॉट (Shwan Abot) दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर झाला आहे.
शेफील्ड शिल्ड स्पर्धेत न्यू साउथ वेल्सतर्फे विक्टोरियाविरुद्ध खेळताना जोश हेजलवूड आणि शॉन एबॉट दोघांनाही हॅमस्ट्रिंगची समस्या जाणवली होती. त्यानंतर दोघांनाही मैदानातून बाहेर काढण्यात आलं आणि स्कॅनसाठी पाठवण्यात आलं. हेजलवूड आता फिट झाला असून पहिल्या कसोटीमध्ये खेळणार आहे, पण एबॉटची जखम गंभीर असल्याने तो पर्थ कसोटीमधून बाद झाला आहे. तपासणीनंतर संघ व्यवस्थापनाने त्याला पहिला सामना खेळवू नये असा निर्णय घेतला आहे.
हेजलवूडला पूर्ण विश्रांती देण्यात आली आहे, जेणेकरून तो पहिल्या कसोटीत तंदुरुस्त अवस्थेत मैदानात उतरू शकेल. एबॉटचे बाहेर होणे ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का आहे, कारण कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आधीच दुखापतीमुळे पर्थ कसोटीमधून बाहेर आहे. कमिन्स सध्या पाठदुखीवर उपचार घेत आहे.
शॉन एबॉटच्या गैरहजेरीत ब्रेंडन डोगेटला कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. डोगेट गेल्या 12 महिन्यांपासून ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात राखीव खेळाडू म्हणून आहे. हॅमस्ट्रिंगमधून सावरल्यानंतर त्याने साऊथ ऑस्ट्रेलियासाठी खेळताना दोनदा 5 विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, पॅट कमिन्सने आपल्या फिटनेसबद्दल अपडेट दिलं आहे. त्याने सांगितलं की, सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर नेट्समध्ये गोलंदाजी करताना स्वतःला चांगलं वाटतंय. तो 4 डिसेंबरला गाबा कसोटीपासून खेळताना दिसू शकतो.
सध्या पर्थ कसोटीमध्ये कमिन्सच्या जागी स्कॉट बोलंडला खेळवले जाण्याची शक्यता आहे. बोलंडबरोबर हेजलवूड आणि मिचेल स्टार्क (Mitchell Starc) हे मुख्य वेगवान गोलंदाज असतील.
पर्थ कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: स्टीव स्मिथ (कर्णधार), स्कॉट बोलंड, अॅलेक्स केरी, ब्रेंडन डोगेट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल स्टार्क, जेक वेदरल्ड, ब्यू वेबस्टर.
इंग्लंड संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), हॅरी ब्रूक (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, विल जॅक, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ, मार्क वूडक, मार्क टॉक.
Comments are closed.