SIP द्वारे गुंतवणूक सुरु केल्यास 10 वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी कसा उभारायचा? जाणून घ्या
एसआयपी गुंतवणूक मुंबई : भारतात प्रत्येकाला आर्थिक सक्षम व्हायचं असतं. आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्यास कुटुंबाचं जीवन सुखकर होतं. जेव्हा कोट्यधीश व्हायची गोष्ट येते तेव्हा अनेक जण ते आपल्याला कधी जमणार नाही या विचारातून ते सोडून देतात. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास केवळ 10 वर्षात तुम्ही कोट्याधीश होऊ शकता.
साधारणपणे एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरु केल्यास साधारणपणे 12 टक्के सीएजीआरनं परतावा मिळणं अपेक्षित धरलं जातं. 10 वर्षांचं नियोजन करुन कोट्यधीश व्हायचं असल्यास मासिक 43500 रुपयांची एसआयपी सुरु करावी लागेल. या 10 वर्षात 52.2 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. तर तुम्हाला मिळणारा परतावा 48.8 लाख रुपये असेल. म्हणजेच 10 वर्षानंतर 1.01 कोटी रुपयांचा कॉर्पस जमा होईल. म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीद्वारे मिळणारा परतावा शेअर बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतो. ही कम्पाऊंडिंगची कमाल असून त्याला वॉरेन बफेट 8 वं आश्चर्य म्हणतात.
जर तुम्हाला 43500 रुपयांची एसआयपी करणं शक्य नसल्यास स्टेपअप एसआयपीचा पर्याय देखील आहे. सुरुवात 30000 रुपयांच्या एसआयपीनं करु शकता. वार्षिक 10 टक्के स्टेपअप करुन 10 वर्षात 1 कोटी रुपयांजवळ पोहोचू शकतो. एसआयपीद्वारे कोट्यधीश होणं सत्यात उतरु शकतं. मात्र, सातत्य आणि समजूतदारपणा आवश्यकता असते.
एसआयपी सुरु करणं सोप असतं, फक्त समजूतदारपणा आमि नियमितपणा असणं आवश्यक आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला किती पैसे लागणार आहेत किती वर्षात पाहिजेत हे निश्चित करावं. तुम्ही गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी किती जोखीम पत्करु शकता याचा विचार करा. मार्केट मध्ये थोडे चढ उतार झाल्यास जोखीम उचलू शकता याचा विचार करावा.
तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंड एप आणि वेबसाईटला भेट द्या. तिथं केवायसी प्रक्रिया अपडेट करा. जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर इक्विटी फंड चांगला पर्याय आहे. जर तुम्ही दरमहा गुंतवणूक करु शकत असला तर 1000 किंवा 5000 रुपयांपासून सुरुवात करु शकता. ऑटो डेबिट पर्याय सुरु करुन दरमहा गुंतवणूक करु शकतात.
म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही एसआयपीद्वारे गुंतवणूक करु शकता. त्याशिवाय आता स्टॉकमध्ये एसआयपी देखील करता येते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.