एक शतक अन् दोन अर्धशतक! वर्ल्ड कपमध्ये सांगलीच्या स्मृती मानधनाचा डंका, 9 सामन्यांत ठोकल्या इतक
स्मृती मानधना बातम्या : महिला वनडे वर्ल्ड कप 2025 मध्ये टीम इंडियाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिने जबरदस्त कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या फलंदाजीच्या बळावर ती या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. एवढंच नव्हे, तर तिने महान फलंदाज मिताली राज हिचा विक्रम मोडीत काढला आहे.
माइलस्टोन अनलॉक केले! 🔓#TeamIndia उपकर्णधार स्मृती मानधना हिच्याकडे आता ICC महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत भारतीय खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या आहेत 👏
अपडेट्स ▶️ https://t.co/TIbbeE4ViO#WomenInBlue | #CWC25 | #INDvSA | #फायनल | @mandhana_smriti pic.twitter.com/spAmzZvIR3
— BCCI महिला (@BCCIWomen) 2 नोव्हेंबर 2025
मिताली राजचा विक्रम मोडला
वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्मृतीने 58 चेंडूत 8 चौकारांसह 45 धावा केल्या. या खेळीमुळे ती एका वर्ल्ड कप हंगामात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. पूर्वी हा विक्रम मिताली राजच्या नावावर होता, जिने 2017 च्या वर्ल्ड कपमध्ये 409 धावा केल्या होत्या. मात्र स्मृतीने 2025 मध्ये 434 धावा करून हा विक्रम आपल्या नावावर केला.
स्मृती मानधना हिने टूर्नामेंटचा शेवट 434 धावांसह केला – महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील भारतासाठी सर्वात जास्त 💪 #CWC25 pic.twitter.com/TkvUOXo7de
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) 2 नोव्हेंबर 2025
भारतासाठी महिला वनडे वर्ल्ड कपच्या एका हंगामातील सर्वाधिक धावा
- 434 धावा – स्मृती मानधना (2025)
- ४०९ रेड – मिताली राज (२०१७)
- 381 धावा – पुनम राऊत (2017)
- 359 धावा – हरमनप्रीत कौर (2017)
- 327 धावा – स्मृती मानधना (2022)
9 सामन्यांत स्मृतीची धमाकेदार कामगिरी
स्मृती मानधानाने या वर्ल्ड कपमध्ये एकूण 9 सामने खेळले आणि 9 डावांत 54.25 च्या सरासरीने 434 धावा केल्या. तिच्या नावावर एक शतक आणि दोन अर्धशतकांची नोंद आहे. या स्पर्धेत तिचा सर्वोच्च स्कोर 109 धावा राहिला. तिचा स्ट्राइक रेट 99.08, तर एकूण 50 चौकार आणि 9 षटकार तिने ठोकले. ती एकदा नाबादही राहिली आणि 434 धावा करताना तिने एकूण 438 चेंडूंचा सामना केला. स्मृती मानधनाची ही कामगिरी भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली जाईल. कारण तिने केवळ विक्रम मोडला नाही, तर टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या शिखरावर नेण्यातही मोठा वाटा उचलला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.