स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न तुटलं, दोघांनी जाहीर करुन टाकलं; लग्न का मोडलं? धक्कादायक कारण


स्मृती मानधना आणि पलाश मुच्छालचे लग्न रद्द भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhanna) आणि संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांचे लग्न मोडलं आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न मोडल्याचे (Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding Called Off) अधिकृतपणे जाहीर केले आहे.

स्मृती आणि पलाश यांचे लग्न कशामुळे मोडलं? (Why Smriti and Palash marriage break up?)

लग्नाच्या एकदिवसाआधी स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र यानंतर सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या जात होत्या. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यात भांडण झाल्याचा दावाही सोशल मीडियाद्वारे करण्यात आला. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल या दोघांकडून लग्न का मोडलं, याचं अधिकृत सांगितलेलं नसले तरी पलाश मुच्छलच्या दुसऱ्या अफेअरमुळे स्मृतीसोबत लग्न मोडल्याचं बोललं जात आहे.

लग्नाच्या एकदिवसआधी काय घडलेलं? (Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding Called Off)

लग्नाच्या आदल्या रात्रीपर्यंत सर्वकाही सांगलीत धुमधडाक्यात लग्न सुरु होतं. यादरम्यान, स्मृतींच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे वडील रुग्णालयात दाखल होताच स्मृतीने कोणताही विचार न करता विवाहसोहळा तातडीने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी पलाश मुच्छलही तणावाच्या झटक्याने रुग्णालयात दाखल झाला. दोन कुटुंबांवर आलेल्या या दुहेरी संकटाने लग्न केवळ स्थगितच नव्हे, तर अनिश्चिततेच्या दरीत कोसळले. त्यानंतर स्मृतीने लग्नातील मेहंदी-संगीताचे सर्व फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवले होते.

स्मृती मानधनाची पोस्ट, काय म्हणाली? (Smriti Mandhanna Post)

गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा आणि अफवा पसरत आहेत, म्हणून मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं. मी खूप खाजगी स्वभावाची आहे, पण एक गोष्ट स्पष्ट सांगते की लग्न रद्द झालं आहे. हा विषय इथंच थांबवायला मला आवडेल आणि तुम्ही सगळ्यांनीही तसं करावं, अशी विनंती आहे. सध्या दोन्ही कुटुंबांची गोपनीयता राखावी आणि आम्हाला आमच्या वेगाने हे सगळं समजून घेऊन पुढे जाण्यासाठी थोडी मोकळीक द्यावी, असं स्मृती मानधना पोस्ट करत म्हणाली. स्मृतीच्या या पोस्टनंतर पलाशनेही सोशल मीडियावर पोस्ट केली.

संबंधित बातमी:

Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.