सोलापूर जिल्ह्यात दोस्तीत कुस्ती! दहा पैकी सात ठिकाणी भाजप अन् शिवसेना आमने-सामने
सोलापूर निवडणूक 2025 : सोलापूर जिल्ह्यात अकरा नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीची निवडणूक (Maharashtra Election 2025) आज होत असून यातील अनगर आणि मंगळवेढा या दोन ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे. दरम्यानआज मतदान होत असलेल्या यातील दहा नगरपालिकांमध्ये सात ठिकाणी भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी लढत होत असल्याने दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यंदा प्रथमच सर्व नगरपालिकेत कमळ चिन्हावर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना निवडणूक रिंगणात उतरविल्याने भाजपचे चिन्ह वर पोहोचवण्यात त्यांना यश आले आहे.
Solapur Election 2025 : दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, कुर्डूवाडी, करमाळा, मोहोळ, अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी अशा सात नगरपालिकात भाजप सेनेमध्ये दोस्तीत कुस्ती होतानाचे चित्र आहे. यातील सांगोल्याची निवडणूक सुरुवातीपासून गाजत असून शहाजी बापू पाटलांना एकटे टाकल्यानंतरही त्यांनी सत्ता राखण्यासाठी जोरदार टक्कर दिली आहे. तर विरोधी महाविकास आघाडी मधून अकलूज नगरपालिकेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुतारी चिन्हावर उभाठाला सोबत घेत पॅनल उभा केल आहे. याच पद्धतीने कुर्डूवाडी नगरपालिकेत थेट शिंदेसेने सोबत युती करून भाजपला आव्हान दिली आहे.
बहुरंगी तर काही ठिकाणी थेट सामने, मतदार कोणाला कौल देणार
जिल्ह्यात काही ठिकाणी बहुरंगी तर काही ठिकाणी थेट सामने होत असून आज जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी बाहेर काढणे हे सर्वच पक्षांसमोर आव्हान असणार आहे. आज होणाऱ्या मतदानावर सोलापूर जिल्ह्यात मोठा भाऊ कोण यासाठी भाजप आणि शिंदे सेना यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, बार्शी, कुर्डूवाडी या चार नगरपालिकेत अतिशय काट्याची टक्कर असून आज मतदार कोणाला कौल देणार हे उद्याच्या निकालात स्पष्ट होणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात 287 केंद्रांवर 8 नगराध्यक्ष, 183 नगरसेवकांसाठी आज ‘मतोत्सव’
धाराशिव-जिल्ह्यातील शहरी भागातील मतदारांना आपल्या हक्काचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडीचा योग 4 वर्षांनंतर आला आहे. जिल्ह्यातील 8 नगरपालिकांत 287 केंद्रात 2 लाख 43,667 मतदार मतदान करतील. नगराध्यक्ष व 183 नगरसेवक निवडण्याची आज संधी असणार आहे. निवडणूक विभागाने यासाठी जय्यत तयारी केली असून, यासाठी 1435 कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, भाजप आमदार राणा पाटील, आमदार तानाजी सावंत यांच्यासह अनेक दिवसाच्या प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली आहे. सकाळी साडेसात वाजता मतदान केंद्रावर मतदानाला प्रत्यक्षात सुरुवात झाली
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.