वेस्ट इंडीज-दक्षिण आफ्रिका संघात रोमांचक लढत! शेवटच्या चेंडूवर 2 धावा हव्या होत्या आणि मग…, असा लागला निकाल!

डब्ल्यूसीएल मध्ये डब्ल्यूआय वि एसए: वेस्ट इंडीज चॅम्पियन्स आणि दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स यांच्यात रोमांचक सामना झाला. या सामन्यात चाहत्यांना पावसापासून ते ‘बॉल आऊट’पर्यंत सर्व काही पाहायला मिळाले. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्सच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना 20-20 षटकांचा होता, परंतु पावसामुळे सामना 11 षटकांचा करण्यात आला. ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्सच्या संघांमधील या सामन्याचा निकाल ‘बॉल आऊट’ने लागला. (World Championship of Legends)

ख्रिस गेलच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीज चॅम्पियन्स संघाने प्रथम फलंदाजी केली, पण कर्णधार केवळ 2 धावा करून बाद झाला. तर लेंडल सिमन्सने सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. वॉल्टनच्या नाबाद 27 धावांच्या खेळीमुळे कॅरेबियन संघाने 79 धावांपर्यंत मजल मारली.

दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा डकवर्थ-लुईस-स्टर्न सिस्टममुळे (DLS System) त्यांना 81 धावांचे लक्ष्य मिळाले. या सामन्यात खरी उत्सुकता तेव्हा वाढली, जेव्हा 11 षटकात दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही बरोबरी साधली. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 2 धावांची गरज होती, पण झोन-झोन स्मट्स फक्त एकच धाव घेऊ शकला आणि सामना बरोबरीत संपला.

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामन्याचा निकाल ‘बॉल आऊट’द्वारे काढण्यात आला. (Cricket Ball Out Rule) वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्समध्ये 18 वर्षांपूर्वीचा नियम पुन्हा आणण्यात आला. ‘बॉल आऊट’मध्ये दोन्ही संघांचे पहिले, दुसरे आणि तिसरे थ्रो चुकले, पण दक्षिण आफ्रिकेचा चौथा थ्रो यशस्वी ठरला. वेस्ट इंडीजला चौथ्या प्रयत्नातही यश मिळाले नाही. तर दक्षिण आफ्रिकेने पाचवा आणि शेवटचा थ्रो देखील यशस्वी केला, यासह दक्षिण आफ्रिकेने या चॅम्पियनशिपचा पहिला सामना जिंकला. (WCL South Africa win)

Comments are closed.