वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर श्रीलंकेच्या गोलंदाजाचं आक्रमक सेलिब्रेशन! जाणून घ्या नेमकं काय घडलं

भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यात ‘ट्राय-नेशन’ (त्रिकोणी) मालिका सुरू आहे, ज्यामध्ये अफगाणिस्तान ‘अ’ संघ देखील खेळत आहे. या मालिकेत भारतीय संघाकडून वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली होती. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वैभवला विशेष चमक दाखवता आली नाही; तो 12 चेंडूत 14 धावा काढून बाद झाला.

वैभवला (Vaibhav Suryavanshi) श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शिराज याने बाद केले. बाद केल्यानंतर शिराजने आक्रमक पवित्रा घेतला, जो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. वैभवला बाद केल्यावर त्याने मैदानात जोरजोरात ओरडून आणि गुडघ्यावर बसून जल्लोष केला.

सामन्याचा विचार करता, भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 277 धावा केल्या. भारताकडून ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) 114 चेंडूत 101 धावांची शतकी खेळी केली, तर तिलक वर्माने 97 चेंडूत 60 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात, श्रीलंकेचा संघ 48.5 षटकांत 269 धावांत सर्वबाद झाला आणि भारताने हा सामना 8 धावांनी जिंकला.

Comments are closed.