IND vs AUS: तिसरा टी20 सामना खेळणार नाही ‘हा’ स्टार खेळाडू? जाणून घ्या मोठं कारण समोर
भारत आणि ऑस्ट्रेलिया (T20 series IND vs AUS) यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेचा तिसरा सामना 2 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांची नजर तिसऱ्या सामन्यावर आहे. मात्र, या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी विभागाला मोठा धक्का बसला आहे, कारण त्यांचा स्टार गोलंदाज तिसऱ्या सामन्यात खेळणार नाही.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (Josh hazelwood) तिसऱ्या टी-20 सामन्यात सहभागी होणार नाही. त्याची निवड फक्त पहिल्या दोन सामन्यांसाठीच संघात झाली होती. तो पुढील अॅशेस मालिकेच्या तयारीसाठी उर्वरित 3 सामन्यांत खेळणार नाही. हेजलवूडच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजी निश्चितच कमजोर होईल, कारण दुसऱ्या सामन्यात त्याने विलक्षण गोलंदाजी केली होती आणि भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांना बाद केले होते.
दुसरा सामना मेलबर्नमध्ये झाला होता. भारताने त्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली होती. हेजलवूडने केवळ 4 षटकांत 13 धावा देत 3 बळी घेतले होते. त्याची इकॉनॉमी रेट फक्त 3.20 होती. त्याने पॉवरप्ले मध्येच भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोसळवली होती. त्याने शुबमन गिल, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना बाद केलं. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा किताब मिळाला होता.
आता तिसऱ्या सामन्यात भारताला दमदार कामगिरी करावी लागेल. दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली होती. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) वगळता कोणीही विशेष प्रभाव पाडू शकला नाही. अभिषेकने 37 चेंडूंमध्ये 56 धावा केल्या, पण शुबमन गिलने 5, संजू सॅमसनने 2, सूर्यकुमार यादवने 1 आणि तिलक वर्माने 0 धावा केल्या. त्यामुळे या सर्व फलंदाजांकडून तिसऱ्या सामन्यात चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.
Comments are closed.