सुरेश धस यांना पुन्हा डावललं,विधिमंडळ रुग्णालय समितीचे अध्यक्षपदी नमिता मुंदडा यांची वर्णी
अंडे: महाराष्ट्र विधी मंडळाच्या विविध समित्यांची घोषणा करण्यात आली असून यात धर्मदाय खाजगी रुग्णालय तपासणी समितीचे अध्यक्षपदी बीडच्या केज विधानसभा मतदारसंघाचा आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांची नियुक्ती झाली आहे .यावेळी मात्र पुन्हा एकदा भाजप आमदार सुरेश धस यांना डावलण्यात आले आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या सुरेश धस यांना यापेक्षा मोठ्या पदाची संधी दिली जाणार असल्याची चर्चाही सुरू आहे . (Suresh Dhas) महायुतीमध्ये अनेक बड्या आमदारांना मंत्रीपद न दिलं गेल्याने भाजप आमदारांना राजकीयदृष्ट्या दिली जाणारी संधी म्हणून या समितीच्या पदांकडे पाहिले जात आहे .दरम्यान कॅबिनेट मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या प्रत्येक मित्र पक्षाला विधिमंडळ समित्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळेल आणि सत्तेचे योग्य वाटप होईल असे स्पष्ट केले होते .
भाजपच्या वाटेला 11 समित्या, मित्र पक्षांच्या नियुक्त्या होणे बाकी
राज्य विधिमंडळात विविध प्रकारच्या समित्या असतात .यात महायुतीत भाजपच्या वाटेला 11 समित्या आल्या आहेत .या समितांवरील अध्यक्षांची निवड भाजपकडून करण्यात आली .अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाटेला आलेल्या समित्यांची घोषणा होणे बाकी आहे . राज्याच्या एकूण 29 विधिमंडळ समित्यांपैकी 11 महत्त्वाच्या समित्यांवर भाजपने आपल्या आमदारांचं नाव कोरलं असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडे 9 – 9 समिती असतील असं सांगितलं जात आहे .
दरम्यान भाजपला मिळालेला समित्यांपैकी धर्मदाय खाजगी रुग्णालय तपासणी समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार नमिता मुंदडा यांची वर्णी लागली आहे .यापूर्वी जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सदस्यांमधून होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये आमदार सुरेश धस यांच्याऐवजी नमिता मुंदडा यांनाच संधी देण्यात आली होती .
कोणत्या 11 समित्यांवर भाजप आमदारांची वर्णी?
- सार्वजनिक उपक्रम समिती- राहुल कुल
- पंचायत राज समिती- संतोष दानवे-पाटील
- आश्वासन समिती- रवी राणा
- अनुसूचित जाती कल्याण समिती- नारायण कुचे
- अनुसूचित जमाती कल्याण समिती- राजेश पाडवी
- महिला हक्क आणि कल्याण समिती- मोनिका राजले
- इतर मागासवर्गीय कल्याण समिती- किसन कथोरे
- मराठी भाषा समिती- अतुल भातखळकर
- विशेष हक्क समिती: राम कदम
- धर्मादाय खाजगी रुग्णालय चौकशी समिती- नमिता मुंदडा
- आमदार निवास व्यवस्था समिती- सचिन कल्याणशेट्टी
https://www.youtube.com/watch?v=to2skewm_b8
हेही वाचा
मोठी बातमी: नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, दिल्लीतून सूत्रं फिरली, रायगडचा पेच कायम
अधिक पाहा..
Comments are closed.