सत्याचा मोर्चात ठाकरे ब्रँडची चर्चा

सत्याच्या या मोर्चात ठाकरे ब्रँडचीदेखील चर्चा पाहायला मिळाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्यामुळे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. कार्यकर्त्यांनी दोघांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर झळकावत ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र असा संदेश दिला.

मंचावरच ठाकरे खाली बसले

महापालिका मुख्यालयाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी उभारलेल्या मंचावर सर्व पक्षांचे नेते उपस्थित झाले होते. त्यामुळे ज्येष्ठांना खुर्चीवर बसण्यास प्राधान्य देत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे व आमदार वरुण सरदेसाई हे तिघे मंचावर खाली बसले होते.

असा घुमला आवाज

  • मतदार याद्या दुरुस्त करा, मतचोरी बंद करा
  • संविधान वाचवा, लोकशाही जगवा
  • व्होट चोरून महायुतीला सत्तेत बसविणाऱया निवडणूक आयोगाचा धिक्कार असो
  • मतांची भांडणे पीलिंग पेल्ला, चोणव आयोग, पेहलब आयोग
  • उघडा डोळे बघा नीट, मतदार याद्या आहेत का नीट
  • मत चोरणाऱ्या कमळाबाईचा निषेध असो
  • ईव्हीएम हटाव, मतचोरी रुकाव, लोकशाही बचाव
  • मतचोरांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय
  • मत चोरा, निवडणूक जिंका, हे चालणार नाही, चालणार नाही

Comments are closed.