पक्षात कोणताही वाद नाही, राष्ट्रवादी एकसंघ! देवगिरीवरील बैठकीनंतर संजय बनसोडेंनी सगळंच सांगितल

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उपस्थितीत काल (26 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP Meetings) बैठक पार पडली आहे. बैठकीत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावर सातत्यानं होणाऱ्या टीकेबाबत नाराजी व्यक्त करत, पक्षातील कुणीही आमच्या बाजूनं उभं राहत नसल्याची खंत बोलून दाखवली. तसंच टीकेचे धनी आम्हीच का व्हायचं, यावर वरिष्ठ नेतृत्व भूमिका घेणार का? असा सवालही सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे मुंबईत उपस्थित असूनही प्रफुल पटेल यांनी बैठकीला गैरहजर राहिल्यानं त्यांच्या नाराजीच्या चर्चांनाही उधाण आलं, यावरती  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार संजय बनसोडे यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Sanjay Bansode NCP Meeting Update:  बैठकीत वाद झाल्याच्या प्रसारित बातम्या पूर्णपणे निराधार

आमदार संजय बनसोडे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली काल मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पक्षाच्या सर्व आजी-माजी खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत सर्वांनी एकमताने ठराव मंजूर करत येणाऱ्या काळात सुनेत्रावहिनी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभर अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच वहिनी जो निर्णय घेतील, त्यामागे सर्व आमदार, खासदार व पदाधिकारी ठामपणे उभे राहतील, अशी ग्वाही देण्यात आली. माध्यमांमध्ये बैठकीत वाद झाल्याच्या प्रसारित बातम्या पूर्णपणे निराधार व तथ्यहीन आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ असून पक्ष बळकटीसाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे कार्यरत राहणार आहोत”.

Sanjay Bansode NCP Meeting Update:  पक्ष बळकटीसाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे कार्यरत राहणार

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली काल मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पक्षाच्या सर्व आजी-माजी खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत सर्वांनी एकमताने ठराव मंजूर करून येणाऱ्या काळात सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभर अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच वहिनी जो निर्णय घेतील, त्यामागे सर्व आमदार, खासदार व पदाधिकारी ठामपणे उभे राहतील, अशी ग्वाही देण्यात आली. माध्यमांमध्ये बैठकीत वाद झाल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार व तथ्यहीन आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे एकसंघ असून, पक्ष बळकटीसाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे कार्यरत राहणार आहोत, असंही आमदार संजय बनसोडे यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

NCP Meetings : बैठकीत सुनील तटकरे अन् छगन भुजबळांमध्ये वाद झाल्याची माहिती

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उपस्थितीत काल (26 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP Meetings) पार पडलेली बैठक चांगलीच वादळी ठरल्याची माहिती समोर येत आहे. बैठकीत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावर सातत्यानं होणाऱ्या टीकेबाबत नाराजी व्यक्त करत, पक्षातील कुणीही आमच्या बाजूनं उभं राहत नसल्याची खंत बोलून दाखवली. तसंच टीकेचे धनी आम्हीच का व्हायचं, यावर वरिष्ठ नेतृत्व भूमिका घेणार का? असा सवालही सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे मुंबईत उपस्थित असूनही प्रफुल पटेल यांनी बैठकीला गैरहजर राहिल्यानं त्यांच्या नाराजीच्या चर्चांनाही उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल पटेलांवर होत असलेल्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी सुनील तटकरे मुद्दे मांडत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्पष्टता येण्यासाठी आपण बोलणारच असल्याचं सुनील तटकरेंनी छगन भुजबळांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विशेष म्हणजे सुनील तटकरेंच्या भाषणापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून निघून गेल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना अधिक हवा मिळाली. दरम्यान, प्रफुल पटेल यांच्या गैरहजेरीनंतर नाराजीच्या चर्चा रंगल्या असतानाच, छगन भुजबळांनी मात्र सुनील तटकरे आणि आपल्यात कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट करत अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.

NCP Meetings : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काय काय घडलं?

प्रफुल पटेलांची बैठकीला दांडी
सुनील तटकरेंच्या बोलण्याआधिच पार्थ पवारांची बैठकीतुन EXIT
सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्यात वाद
10 जून पक्षाचा स्थापना मेळावा कुठं घ्यायचा यावरून मतमतांतरं – मेळावा मुंबईत होणार का पुण्यात?
सुनेत्रा पवारांची खंत-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत विषय काढून देखील अद्याप अर्थ खाते पुन्हा देण्यात आले नाही.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.