क्रिकेटचं स्वप्न अधुरंच! ICC च्या निर्णयामुळे अनाया बांगरला मोठा धक्का, ट्रान्स वुमेन असल्याने.

अँथम स्टॅरिंग न्यूज: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि माजी कोच संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर याने काही काळापूर्वी लिंगबदल शस्त्रक्रिया (लिंग बदल) करून स्वतःचे नाव ‘अनाया बांगर’ (अनाई सबिन असे ठेवले आहे. सध्या अनाया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिने स्वतःला क्रिकेटर व मॉडेल म्हणून ओळख दिली आहे. लिंग बदलापूर्वी अनाया क्लब क्रिकेटमध्ये सक्रिय होती आणि तिला चांगला अनुभव होता. आता प्रश्न हा आहे की, अनाया बांगर भारतीय महिला क्रिकेट संघासाठी खेळू शकते का?


आयसीसी चा नवा नियम काय सांगतो?

2024 मध्ये महिला टी-20 वर्ल्ड कप क्वालिफायरदरम्यान ट्रान्स वुमन क्रिकेटर डॅनियल मॅकगेही हिचे उदाहरण चर्चेत आले होते. ती ऑस्ट्रेलियामध्ये जन्मलेली असून, कॅनडाच्या महिला संघात सामील झालेली पहिली ट्रान्स वुमन ठरली होती. मात्र यानंतर आयसीसीने नोव्हेंबर 2023 मध्ये आपल्या पॉलिसीत मोठा बदल केला.

नवीन नियमानुसार, कोणतीही व्यक्ती जिचा शारीरिक विकास पुरुष म्हणून झाला आहे, तिला महिला क्रिकेटमध्ये खेळण्यास परवानगी नाही. मग तिने कितीही सर्जरी, हार्मोन थेरपी अथवा उपचार घेतले असले तरीही. हे स्पष्ट करण्यात आलं आहे की पुरुष ते महिला झालेल्या ट्रान्स वुमनना आता आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी दिली जाणार नाही.

अनाया बांगरसाठी काय अर्थ?

या नियमामुळेच अनाया बांगरला भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळवणं किंवा कोणतंही अधिकृत महिला क्रिकेट स्पर्धा खेळणं शक्य होणार नाही. तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर ती अजूनही क्रिकेटर असल्याचं नमूद करते. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचं तिचं स्वप्न आता आयसीसीच्या नव्या धोरणामुळे पूर्ण होऊ शकत नाही.

आयसीसीच्या नव्या धोरणामुळे ट्रान्स वुमन अनाया बांगरसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाचे दरवाजे बंद झाले आहेत. हे धोरण आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या वादग्रस्त ठरत असलं तरी, आयसीसीने यामागचं कारण ‘न्याय्य स्पर्धा आणि शारीरिक सरसतेचं संतुलन राखणं’ असं दिलं आहे.

हे ही वाचा –

Karun Nair News : इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान करुण नायरचा मोठा निर्णय! अचानक बदलली टीम, आता ‘या’ संघातून खेळणार

आणखी वाचा

Comments are closed.