शिवसेना जमीनदोस्त करू, गिरीश महाजनांच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंचा जोरदार प्रहार; म्हणाले, या वृक

गिरीश महाजनवरील उदव ठाकरे: विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) मोठी गळती सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे एकामागे एक नेते पक्षाला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेना जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे, असे वक्तव्य केले होते. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना गिरीश महाजन यांच्या दाव्यावर प्रश्न विचारला. उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना जमिनीची दोस्त आहे. म्हणून तुम्ही कधीच शिवसेना संपवू शकत नाही.

तुम्ही जमीनशत्रू आहात

आमचे पाय जमिनीवर आहेत आणि या वृक्षाची मूळ खाली मातीत खोलवर रुतली आहेत. तुम्ही (भाजपा) जमिनीचे शत्रू आहात. म्हणूनच मुंबईसह सगळी जमीन मोदींच्या मित्राच्या (गौतम अडाणी) घशात घालू पाहताय. तुम्ही जमीनशत्रू आहात, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

अमित शाह व निवडणूक आयोगाने जी शिवसेना दुसऱ्यांच्या हातात दिलीय, ती अशा प्रकारे भाजपमध्ये कशी विलीन करू शकतात? शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा हा प्रयत्न आहे का? असे उद्धव ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले की, पण ते संपवू शकत नाहीत. इतकी वर्षे होऊनही ते जनतेला माझ्यापासून तोडू शकत नाहीत. त्यामुळे ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’ करायचं आणि मालकांच्या पक्षात विलीन व्हायचं हा शेवटचा पर्याय त्यांच्यापुढं आहे. मी याआधी बोललो आहे की, निवडणूक आयोग कदाचित आमचं निवडणूक चिन्ह दुसऱयाला देऊ शकतो किंवा गोठवू शकतो, पण ‘शिवसेना’ हे नाव ते दुसऱयाला देऊ शकत नाहीत. त्यांना तो अधिकारच नाही. कारण हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का? या धोंड्याला पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही वेडंवाकडं वागलो असू तर गोष्ट वेगळी, पण संविधानानुसार आम्ही काही चूक केली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाहीत. मतांची टक्केवारी वगैरे जे काही असेल ते चिन्हापुरतं आहे. नाव दुसऱ्याला देऊ शकत नाहीत, असे हल्लाबोल त्यांनी केला.

https://www.youtube.com/watch?v=gpkywgruegq

आणखी वाचा

Uddhav Thackeray: निवडणूक आयोग म्हणजे ‘धोंड्या’; शेंदूर फासला तरी…; उद्धव ठाकरेंची ‘सामना’ला स्फोटक मुलाखत, काय काय म्हणाले?

आणखी वाचा

Comments are closed.