कोकणात शिंदे अन् ठाकरे गटाची युतीसाठी गुप्त बैठक;वैभव नाईकांनी माहिती देताच उद्धव ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Elections) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीत शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) आणि ठाकरे गट (Shiv Sena UBT) एकत्र येण्याची चर्चा रंगली होती. तसेच कणकवली शहरात याबाबत गुप्त बैठक झाली होती. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, तसेच स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर, आणि सतीश सावंत हे उपस्थित होते. या बैठकीत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही एकत्र येण्याची चर्चा झाली होती. त्यामुळे कोकणात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येणार असल्याचे सांगितले जात होता. परंतु याच बैठकीवर आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्गमधील कणकवली नगरपंचायत निवडणुकीत (Kankavali Nagarpanchayat Election 2025) पक्षाने शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्यासंबंधीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्गमधील कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी (Nagarpanchayat Election 2025) ‘शहर विकास आघाडी’ म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर ठेवला. मात्र उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या समीकरणाची माहिती घेतल्यानंतर सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली.
संदेश पारकर, वैभव नाईकानी उद्धव ठाकरेंना दिली माहिती- (उद्धव शोकरे एकनाथ शिंदे युतीवर)
भाजपाला शह देण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं आणि त्यासंबंधी स्थानिक पातळीवर चर्चा केल्याची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आली. शिवाय ही शहर विकास आघाडी का महत्त्वाची आहे? यासंबंधी माहिती सुद्धा संदेश पारकर, वैभव नाईक व इतर पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. मात्र याबाबत कुठलाही निर्णय न देता उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे.
राजन तेली काय म्हणाले होते? (Rajan Teli On Konkan Politics)
कोणाशीही युती करू. मात्र शिंदेंशी युती होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले होते. तरीदेखील कणकवलीत अशा पद्धतीची युती होऊ शकते का? याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते राजन तेली यांना विचारले असता यामध्ये फक्त उबाठा गट नाही तर कणकवलीतील इतर समाजसेवा करणारे मंडळे देखील आहेत. ते देखील यात सहभागी आहे. हा केवळ एकट्या शिवसेनेचा प्रस्ताव नाही. शहरासाठी काम करणाऱ्या मंडळींचा प्रस्ताव आलेला आहे. शहराच्या विकासासाठी एकत्र येणे आणि शहरातील मंडळींनी जे मुद्दे मांडले आहे त्यावर विचार करणे काही गैर नाही. यात आम्ही भाजपला विरोध करतोय, असे नाही. शहराच्या विकासासाठी एकत्र येऊया. यानिमित्ताने गावात एक चांगलं वातावरण तयार होईल, अशी सगळ्यांची भूमिका आहे. त्यानुसार सर्वांनी भूमिका घेतली आहे. ते मंजूर करायचे की नाही करायचे हा वरिष्ठांचा निर्णय आहे. त्यांचा जो निर्णय येईल त्यानुसार आम्ही काम करू, असं राजन तेली म्हणाले होते.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.