मुंबई महानगरपालिकेत आमचाच महापौर होऊ दे; उद्धव ठाकरेंचं गाऱ्हाणं, 2012 सालची आठवण करून देत म्हण


उद्धव ठाकरे: आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. काल (दि. 01 नोव्हेंबर) निवडणूक आयोगाविरोधात मनसे आणि महाविकास आघाडीकडून सत्याचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मतचोरीवरून जोरदार तोफ डागली. यानंतर आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (BMC Election) आमचा महापौर होऊदे, असं गाऱ्हाणं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घातलं आहे. विशेष म्हणजे, 2012 च्या मुंबई महानगरपालिकेची आठवण करून देत मागठाणे येथे त्यांनी गाऱ्हाणं घातलं. मागठाणे याठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातून ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रेमाने बोलवलं म्हणूनच या उत्सवाला आलो आहे.  2012 ला आपण इथं गाऱ्हाणं घातल होतं की, मुंबईचा महापौर होऊदे आणि सुनील प्रभू त्याच्यानंतर महापौर झाले. पुढचं मी सांगत नाही. पण तसंच गाऱ्हाणं आपल्या देवाला घातलेलं आहे, असं त्यांनी म्हटलं.

Uddhav Thackeray: मराठी माणूस मागे हटत नाही

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मला विश्वास आहे की, बाकी कोणी ऐकू न ऐको. पण देव आपलं ऐकतो. मी मनापासून बोलतोय. खोट बोलायचं म्हणून बोलत नाही.  आलोय तर सावध करणे माझे काम आहे. आपला मोर्चा झाला त्यामुळे सावध सर्वांनी राहील पाहिजे. अन्यथा मुंबईत जेवढे दिसतोय तेवढे पण पुढील पाच वर्षात दिसणार नाहीत. जुने कार्यकर्ते या ठिकाणी दिसतायत. अजूनही काही आपली माणसे धडपड करत आहेत. संघर्ष म्हटला की, मराठी माणूस मागे हटत नाही. अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. तीच जिद्द तीच हिंमत आपल्याला दिलेली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray Speech at Satyacha Morcha: सत्याचा मोर्चात काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे सत्याचा मोर्चात म्हणाले की, या देशात लोकशाहीचा खून आपल्या डोळ्यांसमोर होत आहे आणि खून करणारे त्या खुर्चीवर दिमाखात बसले आहेत. मत चोरी करणाऱ्यांना सांगतो की, आज तुम्ही नुसती ठिणगी बघताय, पण ही ठिणगी कधी वणवा बनेल हे कळणार नाही. या ठिणगीत तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद आहे, असा इशारा त्यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांचा उल्लेख पुन्हा अॅनाकोंडा असा करत हल्लाबोल केला. पक्ष चोरल्यानंतर मतचोरीही करत असून यांची भूक क्षमत नाही, या अनाकोंडाला आता कोंडायलाच लागेल, नाहीतर हे सुधारणार नाहीत, असे त्यांनी म्हटले. तर “आम्ही एकत्र आलो आहोत, मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी. ही मूठ महाराष्ट्राने आवडलेली आहे. जर मतचोरी करून निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाला, तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी दिला.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Raj Thackeray VIDEO : ठाण्यात 2 लाख, मुंबई उत्तर-पूर्व, पुण्यात 1 लाख मतदारांचा घोळ… कोणत्या मतदारसंघात किती दुबार मतदार? राज ठाकरेंनी यादीच दाखवली, म्हणाले, दिसेल तिथे फोडून काढा

आणखी वाचा

Comments are closed.