Uddhav Thackeray targets BJP over deaths of soldiers


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गरजले होते की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. त्यासाठी प्राणही देऊ, पण हे काश्मीर घेण्यासाठी भारताचे सैन्य पुढे सरकले तेव्हा मोदी-शहा यांनी सरळ शस्त्रसंधी स्वीकारली आणि ट्रम्पपुढे शरणागती पत्करली.

(India-Pakistan war) मुंबई : पाकिस्तानच्या हल्ल्यात भारताच्या सात जवानांना वीरमरण आले. त्यातील एक मुंबईतील मुरली नाईक हे आहेत आणि या तरुण हुतात्म्याचे वय फक्त 23 वर्षे आहे. मुरली नाईक यांचे आई-वडील घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहतात. ते कष्ट करून घरसंसार चालवतात. एकुलता एक मुलगा भारतमातेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर लढताना हुतात्मा झाला. ‘माझा मुलगा देशाच्या कामी आला याचा गर्व आहे,’ असे मुरली यांच्या वडिलांनी सांगितले, पण शेवटी पोटचा गोळा गेल्याचे दुःख तर होणारच. ज्यांना युद्धाचा राजकीय उन्माद चढला आहे, त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. जे युद्धाच्या राजकीय उन्मादाने बेभान झाले आहेत, त्यांनी देशासाठी ना कधी त्याग केला, ना चार आण्याचे शौर्य गाजवले, पण जणू काही हे युद्ध भारतीय जनता पक्ष आणि त्यांचेच लोक लढत आहेत असा प्रचार सुरू आहे, असा जोरदार हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (Uddhav Thackeray targets BJP over deaths of soldiers)

उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारास उत्तर देताना मुरली नाईक आणि दिनेश शर्मा यांना वीरमरण आले. दिनेश शर्मा हेसुद्धा तरुण सैनिक. त्यांनी पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी दोन हात केले. देशासाठी अतुलनीय शौर्य गाजवले आणि भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणांचे सर्वोच्च बलिदान केले. भारतीय सीमेवर असे हजारो दिनेश शर्मा, मुरली नाईक लढत आहेत आणि छातीवर गोळ्या झेलत आहेत, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – India-Pakistan Ceasefire : ट्रम्प यांनी भारताचे सार्वभौमत्व विकत घेतले काय? ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

युद्ध सुरू होण्यापूर्वी संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गरजले होते की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. त्यासाठी प्राणही देऊ, पण हे काश्मीर घेण्यासाठी भारताचे सैन्य पुढे सरकले तेव्हा मोदी-शहा यांनी सरळ शस्त्रसंधी स्वीकारली आणि ट्रम्पपुढे शरणागती पत्करली. पाकबरोबरच्या संघर्षात कालपर्यंत सात जवानांचे बलिदान झाले ते व्यर्थ गेले काय? पाकच्या हल्ल्यात पूंछ-राजौरीत 12 निरपराध नागरिक मारले गेले. त्यांची काय चूक होती? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

शस्त्रसंधीचा खेळ सुरू झाल्यावरही संरक्षणमंत्री ‘ऑपरेशन सिंदूरची’ ‘री’ ओढत आहेत. तरी मूळ प्रश्न आजही कायम आहेत ते म्हणजे ते सहा दहशतवादी आले कसे आणि गायब झाले कसे? त्यांचा ठावठिकाणा का लागला नाही? भारतीय सीमेवर जैशच्या सात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखून त्यांना कंठस्नान घातले जाते. मग पहलगामच्या पर्यटनस्थळावर घुसून अंदाधुंद हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कसे घुसू दिले? कसे मोकाट सोडले? त्यांना 26 भगिनींचा सिंदूर कसा पुसू दिला आणि हे केल्यावर त्यांचे पुढे काय झाले? हे प्रश्न निर्माण होत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – India-Pakistan Ceasefire : …आणि होळीच्या बोंबा सरकार मारत आहे, ठाकरेंचे टीकास्त्र



Source link

Comments are closed.