तक्रार करूनही पोलिसांचं दुर्लक्ष, आरोपींनी दोन्ही भावांना संपवलं; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
उल्हासनगर क्राईम न्यूज : उल्हासनगरच्या कैलास नगर गोळीबार प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि नवं वळण समोर आलं आहे. या दुहेरी हत्येनंतर (Ulhasnagar Crime)आता थेट पोलिसांच्याच (Ulhasnagar Police) भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ‘मुख्य आरोपी शेखर बिराजदार, बलवीर बिराजदार , सागर पाटील यांनी आपल्या साथीदारसह मिळून महिनाभरापूर्वी परिसरात टेम्पो चालवण्यासाठी 10 हजार रुपयांची खंडणी मागितली होती, इतकेच नाही तर यासाठी मारहाण (Ulhasnagar Crime News) देखील केली होती. मात्र या प्रकरणी आधी लेखी तक्रार व नंतर पुघेतलास ठाण्यात दखल पात्र गुन्हा हिललाईन पोलिसांनी दाखल केला होता. 30 एप्रिल रोजी हा खंडणीचा अर्ज, त्यानंतर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. मात्र त्याकडे पोलिसांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. यामुळे तो आरोपी जेलमध्ये न राहता बाहेरच राहिला आणि माझ्या दोन्ही मुलाच्या हत्येचा कारणीभूत ठरला’ असा खळबळजनक आरोप आता मृतकांच्या कुटुंबीयांनी केला आहे. “जर पोलिसांनी वेळीच पावलं उचलली असती, तर आज आमच्या घरातील दोन तरुण मुलांचे प्राण वाचले असते,” असा उद्विग्न सवाल करत कुटुंबीयांनी आता या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी (CID) किंवा सीबीआय (CBI) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
उल्हासनगर क्राईम न्यूज : …तर आज आमच्या घरातील दोन लहान मुलांचे प्राण वाचले असते
उल्हासनगरच्या कैलास नगर भागात झालेल्या गोळीबार प्रकरणात एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण परिसरात वातावरण प्रचंड तापलं आहे. या प्रकरणात सुरुवातीला राजकीय नेत्यांची नावे समोर आल्यानंतर आता मृतकांच्या कुटुंबीयांनी थेट स्थानिक पोलीस प्रशासनालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. मृतकांच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेखर बिराजदार, बलवीर बिराजदार , सागर पाटील आणि त्याच्या गुंडांनी 30 एप्रिल रोजी परिसरात मयत अमोल चव्हाण आणि अनिल चव्हाण यांना टेम्पो चालवण्यासाठी 10 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या खंडणीबहाद्दरांविरोधात पीडित कुटुंबीयांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार आणि अर्ज दिला होता. एवढंच नाही तर खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना मारहाणही केली होती, ज्याची रीतसर नोंद पोलिसात करण्यात आली होती. मात्र, हिललाईन पोलिसांनी या संवेदनशील तक्रारीकडे साफ दुर्लक्ष केलं. कुटुंब जेव्हा जेव्हा पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी जात होतं, तेव्हा तेव्हा “आम्ही तपास करत आहोत” असं जुजबी उत्तर देऊन पोलिसांनी त्यांना घरी पाठवलं, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
Ulhasnagar Crime News: पोलिसांच्या ढिसाळ आणि दुर्लक्षित कारभारामुळे आरोपींचे धाडस वाढले, कुटुंबीयांचा दोष
दरम्यानपोलिसांच्या याच ढिसाळ आणि दुर्लक्षित कारभारामुळे आरोपींचे धाडस वाढले आणि अखेर याच वादातून आरोपींनी एकाच घरातील दोन्ही सख्ख्या भावांवर बेछूट गोळ्या झाडून त्यांची क्रूर हत्या केली. “पोलिसांवरून आता आमचा विश्वास उडाला असून, आरोपींना कोर्टात हजर करण्याबाबतही टाळाटाळ केली जात आहे,” असा संताप कुटुंबाने व्यक्त केला आहे. आता या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन तो CID किंवा CBI कडे वर्ग करावा आणि मुख्य आरोपी सागर पाटील व त्याच्या साथीदारांना फाशी किंवा जन्मठेपेचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
Ulhasnagar Crime: तर आरोपी जेलमध्ये असते आणि माझी मुलं आज जिवंत असती
‘आम्ही 30 एप्रिललाच पोलिसांना लेखी अर्ज दिला होता की हे लोक 10 हजारांची खंडणी मागत आहेत, मारहाण करत आहेत. पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. पोलीस फक्त तपास करतोय असं सांगून आम्हाला हाकलून लावत होते. पोलिसांनी तेव्हाच कारवाई केली असती तर आरोपी जेलमध्ये असते आणि माझी मुलं आज जिवंत असती. आता आम्हाला पोलिसांवर भरोसा नाही, या केसचा तपास सीआयडी किंवा सीबीआयला द्या आणि आमच्या मुलांना न्याय द्या.., अशी मागणीही त्यांनी केलीय.
Ulhasnagar Crime : हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार का?
तर एक महिन्यापूर्वी दिलेल्या तक्रारीवर जर हिललाईन पोलिसांनी कठोर कारवाई केली असती, तर आज एका आईचे दोन दिवे विझले नसते, हे आता स्पष्ट होतंय. मृतकांच्या कुटुंबीयांच्या या गंभीर आरोपांनंतर आता उल्हासनगर पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. खाकी वर्दीवर लागलेल्या या डागावर आता पोलीस वरिष्ठ अधिकारी काय उत्तर देणार आणि या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.