होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन्ही वैमानिकांची सुखरूप सुटका
होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकन लष्कराचे एक अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात हेलिकॉप्टरमधील दोन्ही वैमानिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की हेलिकॉप्टरवर कोणताही हल्ला झाला होता, याचा तपास सुरू आहे.
वृत्तसंस्था आणि माध्यमांच्या अहवालांनुसार, या घटनेची माहिती दोन अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, अमेरिकन प्रशासनाकडून किंवा संरक्षण विभागाकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. होर्मुझ सामुद्रधुनी ही जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची समुद्री मार्गिका मानली जाते. त्यामुळे या भागातील कोणतीही लष्करी घटना आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेते. हेलिकॉप्टर अपघातामागील कारणांचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.
Comments are closed.