चाहत्याने व्हिडिओ काढला म्हणून रागावला अक्षय; माेबाईल हिसकवला! नंतर…! – Tezzbuzz

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) एका फॅनसाेबत वादाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. आता त्या फॅनने सांगितलं की, अक्षयने त्याचा माेबाईल जबरदस्तीने घेतला हाेता.

हाउसफुल 5 हिट झाल्यावर अक्षय कुमारने लंडनमध्ये मजेत वेकेशन एन्जाॅय केलं. तेव्हा त्याचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे, ज्यात ताे एका चाहत्यावर रागवलेला दिसताे, कारण त्या चाहत्याने परवानगी न घेता त्याचा व्हिडिओ काढला. पण त्याच व्हिडिओमध्ये अक्षय त्या चाहत्यासाेबत सेल्फी घेलानाही दिसताे.आता त्या चाहत्याने एक व्हिडिओ टाकून आपली बाजू सांगितली आहे.

त्या चाहत्याने एक नवीन व्हिडिओ टाकला आहे, ज्यात त्याने सांगितलं की अक्षयने राग का केला. तो म्हणाला,”मी ऑक्सफर्ड स्ट्रीटवर सिग्नलला उभा होतो, तेव्हा मला कुणीतरी अक्षय कुमारसारखा वाटला. खात्री करायला मी त्याचा थोडा पाठलाग केला. सुरुवातीला मागून व्हिडिओ काढला,आणि नंतर पुढून व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला, तेव्हा अक्षयने मला पाहिलं, जवळ आले आणि थेट माझा फोन हिसकावला. कदाचित तेव्हा ते बिझी असतील. त्यांनी माझ्या हातातून फोन घेतला आणि माझा हातही पकडला”.

त्या चाहत्याने पुढे सांगितलं की,अक्षयने नंतर फोन परत दिला आणि अगदी शांतपणे बोललाही. तो म्हणाला,”अक्षय सर म्हणाले,’सॉरी बेटा, मी आत्ता बिझी आहे. मला त्रास देऊ नकोस,आणि फोटो-व्हिडिओ पण काढू नकोस’. मी त्यांना म्हणालो,’तुम्ही हे शांतपणेही सांगू शकलात.आता कृपया माझा फोन परत द्या’. त्यांनी लगेच फोन परत दिला आणि विचारलं,’तू कुठून आलास? आणि इथे काय करतोस?’ शेवटी ते माझ्यासोबत फोटोसाठी तयार झाले. काही मोठं वाद-विवाद झालं नाही. ते खरंच खूप छान माणूस आहेत आणि पाहिल्यावर वाटतंच नाही की त्यांचं वय किती असेल,फक्त 35-40 चं वाटत होतं!”

दरम्यान, कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अक्षय कुमारकडे खूप चित्रपट आहेत. तो लवकरच प्रियदर्शनच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटात वामीका गब्बी आणि परेश रावलसोबत दिसणार आहे. ‘हेरा फेरी 3’ हा चित्रपट बऱ्याच चर्चेनंतर आता सुरू होतोय, ज्यात तो पुन्हा सुनील शेट्टी आणि परेश रावलसोबत झळकणार आहे. तसंच ‘वेलकम टू द जंगल’ या मोठ्या स्टारकास्टच्या चित्रपटात अक्षय मुख्य भुमिकत आहे, ज्यात 15 पेक्षा जास्त कलाकार आहेत. याशिवाय, ‘जॉली एलएलबी 3’ आणि ‘हैवान’ हे त्याचे अजून दोन चित्रपट लवकरच येणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित; ८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार सती प्रथेवर आधारलेला चित्रपट…

Comments are closed.