OTT प्रेक्षकांची पसंती ठरला 2025 चा कोर्टरूम ड्रामा; जिओ हॉटस्टारवर ‘धुरंधर 2’लाही टाकले मागे – Tezzbuzz
रणवीर सिंग हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तसेच 2025 -2026 मध्ये त्याचे ‘धुरंधर 2’ आणि धुरंधर हे चित्रपट उत्तम गाजले. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 1813 कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचला होता. मात्र ‘धुरंधर 2’ जिओहॉटस्टारवर धुमाकूळ घालत आहे. दोन्ही चित्रपट त्यांच्या ओटीटी प्रदर्शनापासून सातत्याने ट्रेंडिंगमध्ये आहेत. मात्र 10 महिने जुना एक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ ला टक्कर देत आहे.
तर हा चित्रपट म्हणजे कोर्टरूम ड्रामा ‘जॉली एलएलबी 3’ आहे. हा चित्रपट 2025 मध्ये आला होता. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करुन ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. जर हा चित्रपट पाहायचे असल्यास तुम्ही नेटफ्लिक्स आणि जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन पाहु शकता. तर आता हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर टाॅप 10 मध्ये ट्रेंड करत आहे.
‘जॉली एलएलबी 3’ हा चित्रपट कोर्टरूम ड्रामा जरी असला तरी तो खुप मंनोरंजक चित्रपट आहे. या मध्ये अक्षय कुमार (kumar)आणि अर्शद वारसी यांच्यासोबत सौरभ शुक्ला, अमृता राव, हुमा कुरेशी, गजराज राव आणि सीमा बिस्वास यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
बॉक्स ऑफिसवर ‘पेड्डी’चा धुमाकुळ; अवघ्या चार दिवसांत 150 कोटींचा टप्पा पार
Comments are closed.