एम.एफ. हुसेन-माधुरीची खास मैत्री पुन्हा चर्चेत; ‘देवदास’च्या शूटिंगच्या आठवणी अभिनेत्रीने केल्या शेअर – Tezzbuzz

भारतीय चित्रपटसृष्टीच्या चमकदार जगात अनेक नाती प्रसिद्धीच्या पुढे जाऊन मनात घर करतात. सुपरस्टार माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि नामवंत चित्रकार एम.एफ. हुसेन यांची मैत्री हे त्यापैकीच एक खास नातं. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत माधुरीने या नात्याच्या अनेक आठवणी प्रेमाने सांगितल्या.

माधुरी सांगते की ती अमेरिकेतील डेन्व्हरमध्ये राहत असताना हुसेन यांनी एका दिवशी अचानक फोन आला. ते हसत म्हणाले, “मी तुला कलाकार, स्टार आणि पत्नी म्हणून पाहिलं आहे… आता मला तुला आई म्हणून पाहायचं आहे.” हे ऐकून माधुरीही भारावून गेली. इतकंच नाही तर त्यांनी हजारो किलोमीटरचा प्रवास करून अमेरिकेत तिच्याकडे भेट दिली, फक्त माधुरीला तिच्या मुलांसोबतच्या आईच्या भूमिकेत पाहण्यासाठी.

तिने पुढे सांगितले की हुसेन साहेब नेहमीच तिच्याशी स्पष्टपणे बोलायचे. “कधी ते माझ्या सीनचं कौतुक करायचे, तर कधी सरळ म्हणायचे— ‘मला हे आवडलं नाही.’” एकदा माधुरीने त्यांना एका चित्राचा अर्थ विचारला असता ते म्हणाले, “कलाकार फक्त सुरुवात करतो; खरी कहानी प्रेक्षक पूर्ण करतात.

यानंतर माधुरीने देवदास चित्रपटातील अनुभव सांगितला. संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट भव्य असतात, पण त्यामागे मोठी मेहनत लपलेली असते. “डोला रे डोला” या गाण्याचे शूटिंग तिच्या आणि ऐश्वर्या रायसाठी खूप कठीण होते. जड दागिने, वजनदार लेहेंगा आणि अवघड कोरिओग्राफीमुळे दोघींनाही दमछाक होत होती. माधुरी हसत म्हणाली, “आम्ही दोघी एकमेकींकडे पाहून म्हणत होतो— ‘अरे देवा, हे किती जड आहे.

“मार डाला” या गाण्याचे चित्रीकरणही तितकंच कठीण होतं. पण चित्रपटाची भव्यता आणि पारंपारिकता राखण्यासाठी प्रत्येक पोशाख आणि प्रत्येक फ्रेम उत्तम दिसणं महत्त्वाचं होतं-आणि ते पडद्यावर सुंदरपणे खुललं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

पलाश–स्मृतीच्या लग्नातील विलंबानंतर बहिण पलकची मनाला भिडणारी पोस्ट; फॅन्सनी दिला भरघोस पाठिंबा

Comments are closed.