या सीरीजच्या चार हिट सीझननंतर आता येणार पाचवा भाग, तर IMDb रेटिंगही आहे जबरदस्त – Tezzbuzz

आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहे, म्हणजेच त्या सिरीज अतिशय प्रेक्षकांना भावल्या. अशीच एक सिरीज म्हणजे मिर्झापूर, पंचायत या सिरीज ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. यामधील कथाही ड्रामा, क्राईम, तसेच पंचायतची कथेची नीरागसता हे सर्वामुळे या मालिका लोकप्रिय ठरल्या.

पंचायत (panchyat)हि मालिका बऱ्याच काळापासून प्रेक्षकांची आवडती राहिली आहे. हि मालिका तुम्ही ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ आहे तिथे तुम्ही पाहु शकता. तसेच 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या मालिकेच्या दुसऱ्या सीझनने आपल्या साधेपणाने आणि उत्कृष्ट कथाकथनाने सर्वांची मने जिंकली. यामध्ये गावातील समस्या, प्रेम, निरागस नाती, अश्या आशयाच्या कथेने हि मालिका भरलेली आहे. आणि या मालिकेला प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली असली तरी, या मालिकेची लोकप्रियता कमी झालेली नाही आणि आजही ती भारतातील सर्वोत्कृष्ट वेब सिरीजपैकी एक मानली जाते.

तर या मालिकेचे चार भाग आलेले आहेत. चाहत्यांची पुढील भागाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षकांच्या या उत्साहाला प्रतिसाद म्हणून, निर्माते लवकरच ‘पंचायत सीझन 5’ प्रदर्शित करत आहेत.  जरी अद्याप कोणतीही अधिकृत प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी, निर्माते लवकरच प्रदर्शनाची तारीख जाहीर करतील असा विश्वास आहे आणि या मालिकेला IMDb वर 8.9 रेटिंग मिळाले आहे.

अभिनेत्री खुशी कपूरच झालं ब्रेकअप? दोन वर्षांचं नातं संपल्याच्या चर्चांना उधाण

Comments are closed.