ज्या वादळी खेळीची अख्खा देश वाट पाहत होता, त्याला श्रीलंकेने हवेतच टिपलं! वैभव सूर्यवंशीच्या ‘त

वैभव सूर्यवंशी भारत अ विरुद्ध श्रीलंका अ तिरंगी मालिका : तिंरगा मालिकेतील पहिल्याच सामन्यात यजमान श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारत ‘अ’ संघाचा निर्णय सुरुवातीला तरी अंगलट आल्याचे दिसत आहे. रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली असून, अवघ्या 17 धावांवर भारताने आपले दोन महत्त्वाचे फलंदाज गमावले आहेत. 5 षटकांच्या अखेरीस भारताची धावसंख्या 2 बाद 17 अशी झाली आहे.

वैभव सूर्यवंशी स्वस्तात माघारी

भारतीय क्रिकेटचा नवा चमकता तारा आणि ज्याच्या वादळी फलंदाजीची संपूर्ण क्रिकेट वाट पाहत होता, तो युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी लवकरच आऊट झाला. त्याने आपल्या खेळीची सुरुवातही अत्यंत आक्रमक केली, मात्र एका चुकीने त्याचा घात केला आणि घात झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारत ‘अ’ संघाकडून वैभव सूर्यवंशीने डावाची सुरुवात केली. मैदानावर पाऊल ठेवताच त्याने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळायला सुरुवात केली. श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दबाव टाकताना त्याने अवघ्या 12 चेंडूंमध्ये 3 खणखणीत चौकार ठोकले. वैभव ज्या पद्धतीने चेंडू टाईम करत होता, ते पाहून आज मैदानावर सूर्यवंशी नावाचं वादळ घोंगावणार, असं स्पष्ट दिसत होतं.

…आणि तो ‘एक’ घातकी क्षण आला!

डावाच्या चौथ्या षटकात श्रीलंकेचा गोलंदाज मोहम्मद शिराज गोलंदाजीसाठी आला. या षटकातील चौथ्या चेंडूवर वैभवने एक मोठा फटका मारण्याचा निर्णय घेतला. शिराजने टाकलेला तो चेंडू फुल-लेंथ होता. वैभवने पूर्ण ताकदीनिशी तो चेंडू डोक्यावरून मैदानाच्या समोरच्या दिशेने (Mid-off) टोलावण्याचा प्रयत्न केला. पण, नेमका याच क्षणी घात झाला. चेंडू बॅटवर लागताच वैभवच्या हातातील बॅट हलकीशी फिरली आणि चेंडू थेट मिड-ऑफवर उभा असलेला श्रीलंका ‘अ’ संघाचा कर्णधार सहान अराचचिगेच्या हातात गेला. वैभवने 12 चेंडूंच्या खेळीत 3 चौकारांच्या मदतीने 14 धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 13.4 षटकांत 16 धावा होती.

प्रभसिमरन सिंगही अपयशी

वैभव बाद झाल्यानंतर भारतीय संघाला या धक्क्यातून सावरण्याची संधीही मिळाली नाही, कारण पुढच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर दुसरा सलामीवीर प्रभसिमरन सिंगही बाद झाला. चमिका करुणारत्नेच्या चेंडूंवर चौकार मारण्याच्या प्रयत्नात तो समरविक्रमाकडे झेल देऊन बसला. प्रभसिमरनने 11 चेंडूंत फक्त 2 धावा केल्या. त्यामुळे 16 धावांवरच भारताचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले.

ऋतुराज आणि प्रियांशवर डावाची धुरा

सध्या क्रीझवर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि प्रियांश आर्य खेळत आहेत. ऋतुराजने 3 चेंडूत 1 धाव केली असून प्रियांशने 4 चेंडू खेळून अजून खाते उघडलेले नाही. श्रीलंकेकडून चमिका करुणारत्नेने 3 षटकात 7 धावा देत 1 विकेट घेतला, तर मोहम्मद शिराजने 2 षटकात 10 धावा देत 1 विकेट घेतला आहे. भारताकडे अजून तिलक वर्मा, आयुष बदोनी आणि अनुकूल रॉय सारखे दर्जेदार फलंदाज बाकी आहेत. त्यामुळे आता मधली फळी भारताचा डाव सावरून सन्मानजनक धावसंख्या उभारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा –

Arjun Tendulkar : आधी पहिल्याच षटकांत 2 विकेट्स, मग शिवम दुबेच्याही आधी मैदानात उतरला, 66 धावांची वादळी खेळला, अर्जुन तेंडुलकरचा ‘वन मॅन शो’!

Comments are closed.