वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर; चौकशी अहवालाने खळबळ, नेमकं काय म्हटलंय?

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात (Vaishnavi Hagawane Death Case) विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीने चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालात वैष्णवीचा मृत्यू हा कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठीचा अत्याचार यामुळेच झाल्याचं नमूद करण्यात आलंय. वैष्णवीचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नाही, किंवा ती फक्त आत्महत्येची घटना नाही तर तो हुंडाबळीचा प्रकार आहे. पोलिसांनी त्याच दिशेने तपास करण्याची गरज असल्याच अहवालात नमूद करण्यात आलंय. या समितीने आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत महत्वाची शिफारस अहवालात केली आहे.

सुपेकर यांचा सहभाग या प्रकरणात आढळून आला आहे. सुपेकरांची ध्वनिफीत देखील समोर आली. त्यामुळे सुपेकरांना निलंबित करून त्यांना सहआरोपी करण्याची शिफारस या समितीने केलीय. या समितीचे तिसरा महत्वाचा निष्कर्ष पुणे ग्रामीण पोलिसांबाबत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वैष्णवीची आत्महत्या घडल्याचं समितीने म्हटलंय. वैष्णवीची मोठी जाऊ मयुरीने मारहाण, छळ , विनयभंग , मारून टाकण्याची धमकी अशा अनेक प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने वैष्णवीची आत्महत्या झाल्याचं म्हटलंय.

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात तपासात त्रुटी-

1. वरिष्ठ पो.अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची आवश्यकता

2. जालिंदर सुपेकरांना तपासापासून दूर ठेवा

3. प्रकरण आत्महत्येचे दिसत असले तरी पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार व हुंडाबळीचे

4. जालिंदर सुपेकरांचा सहभाग आढळल्यास निलंबित करून सहआरोपी करा

5. वैष्णवी हगवणेंना पती,सासरच्या लोकांकडून अमानुष मारहाण,छळ,जाच झाला

6. हुंडा रुपात ब्रँडेड गाडी,चांदीची भांडी,सोने,रोख रक्कम घेतल्याचे सबळ पुरावे

7. तपास तातडीने पूर्ण करा, आरोपी आणि सहआरोपी सुटणार नाहीत याची दक्षता घ्या..

नेमकं प्रकरण काय?

वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे 2025) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.

वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=A_RV2_BN8P0

संबंधित बातमी:

वैष्णवी प्रकरणात तपास करून जालिंदर सुपेकरांनासुद्धा सहआरोपी करण्याची आवश्यकता; विधीमंडळ समितीच्या अहवालात पोलिसांवर कडक ताशेरे

आणखी वाचा

Comments are closed.