क्षमता 10 लोकांची अन् घुसले 17 जण, प्रवेश करताच प्रवीण दरेकरांसह सर्व लिफ्टमध्ये अडकले

दहा जणांची क्षमता असलेल्या लिफ्टमध्ये 17 जण घुसले अन् भाजप आमदार प्रवीण दरेंकरांसह सर्वजण आत अडकले. सुमारे 10 मिनिटांच्या थरारानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून सर्वांची सुटका करण्यात आली. प्रवीण दरेकर हे वसई येथे एका कार्यक्रमासाठी गेले असताना ही घटना घडली.
वसई येथे जुन्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कौल हेरिटेज सिटीमधील अपुलँड ग्रँड बॅक्वेट हॉलमध्ये शिबिर ठेवण्यात आले होते. या शिबिराला उपस्थित राहण्यासाठी प्रवीण दरेकर वसईला गेले होते. वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये जाण्यासाठी दरेकर लिफ्टमध्ये घुसले. दहा माणसांची क्षमता असलेल्या या लिफ्टमध्ये 17 लोकांनी प्रवेश केला. यामुळे लिफ्ट बंद पडली.
लिफ्टचा दरवाजा उघडण्यासाठी तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. सुमारे 10 मिनिटे हा थरार सुरू होता. यानंतर लोखंडी रॉड आणि अन्य वस्तूंच्या सहाय्याने लिफ्टचा दरवाजा तोडून प्रवीण दरेकरांसह इतरांची सुटका करण्यात आली. दरेकर यांच्यासोबत वसईच्या स्नेहा दुबे पंडित आणि नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक हेदेखील लिफ्टमध्ये अडकले होते.
Comments are closed.