अतिशय लाजिरवाणे! भाजप दुटप्पी वागणुकीचा महागुरू; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

पाकिस्तानकडून हिंदुस्थानविरोधात नेहमीच कुरघोडी सुरू असतात. सतर्क सुरक्षा दलामुळे पाकड्यांचे सर्व कुटील डाव हाणून पाडण्यात येतात. कश्मीर खोऱ्यात घडणाऱ्या हिंसाचार आणि दहशतवादी कारवायांना पाकिस्तानचा हात असल्याचे आता लपून राहिलेले नाही. त्यातच आता केंद्र सरकारने पाकिस्तानसोबत क्रिकेट, हॉकी खेळण्याला परवानगी दिली आहे. सरकारच्या या दुटप्पी भूमिकेचा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे.
पायाभूत सुविधांच्या कामांचे नाव आणि त्याचे नाव “सिंदूर” असे ठेवले जात आहे…
रॅली आणि भाजपचे राजकारण “सिंदूर” च्या आसपास बँकिंग आहे…त्या हत्याकांडात सहभागी दहशतवादी- केंद्र सरकार ते कसे आले आणि काय वाईट आहे हे त्यांना कळत नाही, ते कोठे गेले हे त्यांना ठाऊक नाही!
आणि त्याऐवजी… pic.twitter.com/6qexau0zga
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 19 जुलै, 2025
याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी भाजपला दुटप्पी वागणुकीचा महागुरू म्हटले आहे. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पायाभूत सुविधांच्या कामांना “सिंदूर” असे नाव दिले जात आहे… सध्या भाजपचे राजकारण “सिंदूर” भोवती फिरत आहे… पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी कसे कुठून आले आणि कुठे गेले आहेत हे माहित नाही, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान सर्व दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत त्यावर बहिष्कार टाकण्याऐवजी, केंद्र सरकारने बीसीसीआयला पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळ खेळण्यास परवानगी दिली आहे. तसेच आशिया कपमध्ये पाकिस्तानसोबत हॉकी आणि क्रिकेट खेळण्यासही सहमती दर्शवली आहे. खरोखरच भाजप दुटप्पी वागणुकीचे महागुरु आहेत. असे असून आता भाजप देशभक्तीचे प्रमाणपत्रे देते. हे खूप लाजिरवाणे आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
Comments are closed.