अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर

बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल उठलेल्या अफवांचे त्यांच्या कुटुंबीयांनी खंडन केले.

काही न्यूज चॅनेलवर सोमवारी सकाळी धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त प्रसारित केले गेले. त्यानंतर ईशा देओल हिने सोशल मीडियावर पोस्ट केली. ‘मीडिया अतिरेक करत असल्याचे दिसतेय. चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे तिने स्पष्ट केले. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी ही चुकीच्या बातम्यांबद्दल संताप व्यक्त केला.

ब्रीच कॅण्डीमध्ये सेलिब्रिटींची गर्दी

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात पोहोचल्या. सलमान, शाहरूख, गोविंदा, अमीषा पटेल, आमीर खान रुग्णालयात पोहोचला.

Comments are closed.