Jabbar Patel – ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना शाहू पुरस्कार प्रदान

जेष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना 39 वा शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कोल्हापुरात शाहू स्मारक येथे एका कार्यक्रमात खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते जब्बार पटेल यांना सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम एक लाख रुपये, मानपत्र आणि शाल श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्कार स्वरूपात मिळालेली एक लाख रुपयांची ही रक्कम बाबा आमटे यांच्या आनंदवन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांना विभागून दिली. यावेळी जब्बार पटेल यांनी राजश्री शाहूंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
Comments are closed.