एकाच घरात तिघांचे मृतदेह, पत्नी-मुलीला संपवून स्वत:चाही शेवट, 11 वर्षांचा वेदांत शाळेत गेल्यामु

आत्महत्या करा केस: विरारमध्ये एकाच घरात बुधवारी (दि.26) तिघांचे मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलीस तपासात मोठा खुलासा झालाय. आर्थिक विवंचनेतून पित्यानेच पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. शिवाय पत्नी आणि मुलाला संपवल्यानंतर इसमाने स्वत: देखील आत्महत्या करत जीवन संपवलंय. उदयकुमार काजवा असं आत्महत्या करणाऱ्या बापाचं नाव असून त्याने आत्महत्या (Virar Suicide Cas) करण्यापूर्वी पत्नी विना आणि मुलगी शिवालिका दोघांनाही संपवलंय.

आर्थिक विवंचनेला कंटाळून पित्याने स्वत:सह कुटुंबातील दोघांना संपवलं

अधिकची माहिती अशी की, विरारमध्ये एकाच घरात तिघाचे मृतदेह सापडले होते, ही घटना बुधवारी उघडकीस आली होती. आर्थिक विवंचनेला कंटाळून पित्याने आपल्या पत्नीला आणि पाच वर्षाच्या मुलीची हत्या करुन स्वतः आत्महत्या केली आहे.  उदयकुमार काजवा असं बापाच नाव आहे, तर पत्नीच नाव विना काजवा आणि मुलीच नाव शिवालीका काजवा असं आहे. हे विरार पश्चिम ग्लोबल सिटी येथे मैत्री हाईट्स च्या दहाव्या मजल्यावर रहात होते.

लाईट बिल न भरल्याने महावितरणाने लाईट कापली होती

उदयकुमार बेरोजगार होता. तर पत्नीला  दुर्धर आजार होता. पत्नी खासगी क्लास चालवून घरखर्च चालवत होती. दोन दिवसापूर्वी लाईट बिल न भरल्याने महावितरणाने लाईट कापली होती. 11 वर्षाचा वेदांत काजवा हा माञ शाळेत गेल्यामुळे तो वाचला. सध्या तिघांचे ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.  बोळींज पोलीस ठाणे मध्ये अदाखल पात्र गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=mafjczxjr3i

इतर महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Gade: नराधम दत्तात्रय गाडे शिरूरमधील ऊसाच्या शेतात लपला? पोलिसांकडून परिसर पिंजायला सुरुवात, ड्रोनद्वारे शोधमोहीम

अधिक पाहा..

Comments are closed.