वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये भयंकर प्रकार, कैद्याच्या अंडरवेअरमध्ये निघाला चिरलेला रबरी बॉल;

वलमिक कराड: मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा कारागृह (Beed District Jail) सतत चर्चेचा विषय ठरत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराड (Walmik karad) आणि त्याची टोळी सध्या याच कारागृहात शिक्षा भोगत आहे. वाल्मिक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप झाल्यानंतर या कारागृहाची राज्यभरात चर्चा रंगली होती. तसेच कराड गँग आणि गित्ते गँग यांच्यात तुरुंगातच गँगवॉर झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. आता बीड जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

वाल्मिक कराड शिक्षा भोगत असलेल्या बीड जिल्हा कारागृहात एका आरोपीकडून गांजासदृश पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कारागृहामध्ये अंमली पदार्थांची तस्करी कोण करतंय? याबाबत विविध तर्कवितर्कांना ऊत आला आहे. संबंधित न्यायालयीन बंदीकडून गांजासदृश पदार्थ जप्त करण्यात आला असून, दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई आणि पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारागृहात गांजासदृश पदार्थ सापडल्याने खळबळ

यापूर्वी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याच्या आरोपांमुळे बीड जिल्हा कारागृह चर्चेत आले होते. आता त्याच कारागृहात गांजासदृश पदार्थ सापडला आहे. सुभेदार बलभीम चिचाणे आणि पोलीस हवालदार अब्दुल वाजेद अब्दुल अजिज हे कर्तव्यावर असताना बराक क्रमांक 7 मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदी अक्षय ऊर्फ चिंटू मिठ्ठू गायकवाडची हालचाल संशयास्पद वाटली.

बीड जिल्हा कारागृह पुन्हा चर्चेत

त्याची झडती घेतली असता, त्याच्या अंडरविअरमध्ये रबरी फिकट आकाशी रंगाचा चिरलेला बॉल आढळून आला, ज्यामध्ये गांजासदृश पदार्थ सापडला. तसेच, त्याच्या पँटच्या खिशात असलेल्या पुडीत हिरवट रंगाचा पाला, बारीक भुरकट पदार्थ, हिरवट रंगाची फुले, बिया, बोंडे आणि काड्या असा अंमली पदार्थसदृश मुद्देमाल मिळाला. हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अक्षय गायकवाडविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे बीड जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Walmik Karad : संतोष देशमुखांचा मारेकरी धनुभाऊ-दादांच्या बॅनरवर झळकला, वाल्मिक कराडचे परळीत बॅनर

Ujjwal Nikam On Santosh Deshmukh Case: राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड; आता संतोष देशमुख प्रकरणाचं काय?, उज्जवल निकम म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.