पश्चिम बंगाल हा इस्लामिक खलीफत आहे.

भाजपच्या तीव्र टीकेनंतर राज्य सरकारची माघार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पश्चिम बंगालमधील कोलकाता महानगरपालिकेने हिंदूंच्या सणाला सुटी देण्याचे नाकारुन, ईद उल फित्र या सणाला दोन दिवस सुटी देण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाने तृणमूल केँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर मुस्लीमांचे लांगूलचालन चालविल्याचा आरोप केला आहे. अखेर भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली महापालिकेने ईदची दोन दिवस सुटी रद्द केली आहे.

विश्वकर्मा पूजा हा या राज्यातील हिंदूंचा महत्वाचा धार्मिक सण आहे. या सणाची सुटी रद्द करण्यात आली असल्याची सूचना कोलकाता महानगरपालिकेने काढली होती. मात्र मुस्लीमांच्या ईद उल फित्र या सणाला मात्र सलग दोन दिवस सुटी घोषित करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर, महानगरपालिकेने नमते घेतले असून ईदच्या सुटीचे नोटीफिकेशन डीलीट करण्यात आले आहे. मात्र, विश्वकर्मा पूजा या सणाच्या सुटीचे काय करण्यात आले आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

हे तर खिलाफतीचे राज्य

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार हिंदूद्वेष्टे आहे. ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न राज्यात मुस्लीम खिलाफतीचे राज्य आणण्यासाठी चाललेला आहे. राज्यातील समस्त हिंदू जनता या मुळे संतप्त झाली असून या सरकारच्या उलट्या गणतीला आता प्रारंभ झाला आहे. ममता बॅनर्जी यांच्या मनात हिंदूंसंबंधात रोष अणि द्वेष आहे. त्याचे प्रत्यंतर अशा निर्णयांमधून येत असते, अशी टीका भारतीय जनता पक्षाने बुधवारी केली होती. अखेर या टीकेला महानगरपालिकेने प्रतिसाद दिला.

राज्य सरकारच्या अनुमतीशिवाय

राज्य सरकारच्या अनुमतीशिवाय ईदची दोन दिवस सुटी देण्याचा, तसेच विश्वकर्मा पूजादिनाची सुटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी सारवासारवी कोलकाता महापालिकेने केली आहे. आता सुटीचे नोटीफिकेशन रद्द करण्यात आले आहे, असे महापालिकेने स्पष्ट करत दोन पावले माघार घेतली.

Comments are closed.