कडक उन्हात घ्या काळजी, हे करून पहा
दोन दिवसांनी नौतपा सुरू होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ऊन प्रचंड असते. याला नौतपा किंवा वैशाख वणवा म्हणतात. या दिवसांमध्ये सूर्य आग ओकत असतो.
हा काळ सर्वात उष्ण असतो. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. पाणी भरपूर पिणे, शक्यतो ताक आहारात समाविष्ट करा.
विनाकारण दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळा. बाहेर जायचे असल्यास डोक्याला फडके गुंडाळा. कडक उन्हामध्ये थंड पाणी एकदम पिणे टाळा.
Comments are closed.