कोहलीचं शतक सेलिब्रेशन, रोहितच्या तोंडातून YZ*** बाराखडी! नेमकं काय म्हणाला? अर्शदीपचा खुलासा


विराट कोहलीचे शतक रोहित शर्माची प्रतिक्रिया : भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs Sa 1st ODI) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी 30 नोव्हेंबर 2025 रोजी रांचीच्या जेएससीए क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) तुफानी शतक ठोकताच भारतीय ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्मापेक्षा (Rohit Sharma) आनंदी असा दुसरा कोणीच दिसत नव्हता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने आपल्या वनडे करिअरमधील 52वे शतक पूर्ण केले. 120 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 7 षटकारांच्या जोरावर त्याने 135 धावांची शानदार खेळी खेळली. कोहली मैदानावर शतक सेलिब्रेट करत असताना ड्रेसिंग रूममधील रोहित शर्माचा रिअॅक्शन पाहण्यासारखे होते. कॅमेऱ्यात रोहित काहीतरी म्हणताना दिसला आणि त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्याच्या शब्दांचे विविध अर्थ काढण्यास सुरुवात केली. मात्र आता अर्शदीप सिंगनेच उघड केले आहे की हिटमॅन रोहितने नेमकं काय म्हटलं होतं.

अर्शदीप सिंगचा व्हिडिओ पोस्ट करत खुलासा

विराट कोहलीने शतक ठोकताच ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्मा काय म्हणाला होता, याविषयी चर्चेला उधाण आले. त्या क्षणी रोहितच्या शेजारी उभा असलेला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने याचा खुलासा करत सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. रांची वनडेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबर 2025 रोजी अर्शदीपने एक छोटासा व्हिडिओ बनवला आणि तो त्यांच्या आयपीएल संघ पंजाब किंग्सने आपल्या अधिकृत अकाऊंटवर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये अर्शदीप हसत म्हणताना दिसतो की, “कालपासून खूप मेसेज येतायत की रोहित भाऊंनी विराट भाऊंच्या सेंचुरीवर नेमकं काय म्हटलं? तर मी सांगतो… त्यांनी म्हटलं, ‘नीली परी, लाल परी, कमरे बंद… मला नादिया पसंत…” अर्शदीप सिंहने रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला याबद्दल चुटकी घेत मजेशीर अंदाजात सांगितलं, पण ते पूर्णपणे खरं नसल्याचंही स्पष्ट केलं.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीमध्ये शतकी भागीदारी…

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 136 धावांची शतकी भागीदारी रचली. रोहितने 51 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने 57 धावा केल्या. या खेळीत त्याने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. विराट कोहलीनेही तडाखेबाज शतक ठोकत नवनवे विक्रम मोडले आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दबदबा कायम ठेवला.

पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहित शर्मा (57), विराट कोहली (135) आणि कर्णधार केएल राहुल (60) यांच्या दमदार खेळींच्या जोरावर भारताने 50 षटकांत 8 विकेट्स गमावून 349 धावा केल्या. प्रत्युत्तर दक्षिण आफ्रिकेने झुंजार लढत दिली, पण 49.2 षटकांत 332 धावांवर ऑलआऊट झाली. भारताने हा सामना 17 धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेचा दुसरा सामना येत्या बुधवारी रायपूरमध्ये खेळला जाणार आहे.

हे ही वाचा –

मिनी लिलावासाठी 1355 खेळाडूंकडून रजिस्ट्रेशन, ग्लेन मॅक्सवेलची माघार, 2 कोटींच्या बेस प्राईसमध्ये फक्त 2 भारतीय खेळाडू तर….

आणखी वाचा

Comments are closed.