ब्रायन लारा- विराट कोहली नव्हे, हॅरी ब्रूकच्या मते 'हा' खेळाडू आहे कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज!
इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूकने ICC मेन्स कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी रँकिंगमध्ये टॉप स्थान पटकावल्याबद्दल जो रूटचं (Jo Root) कौतुक केलं आहे. रूटच्या जबरदस्त खेळीमुळे इंग्लंडने सोमवारी लॉर्ड्समध्ये भारतावर 22 धावांनी विजय मिळवला. रूटने या सामन्यात 104 आणि 40 धावा केल्या आणि 888 रेटिंग गुणांसह पुन्हा नंबर 1 स्थान मिळवलं. इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
जो रूट एक जबरदस्त खेळाडू आहे. मी त्याच्या बरोबरीचा नाही, त्यामुळे मी आनंदाने त्याला हे स्थान देईन. तो मागच्या 12-13 वर्षांपासून सातत्याने खेळत आला आहे. माझ्या मते तो कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाज आहे.
ब्रूकने जोफ्रा आर्चरचंही (Jofra Archer) कौतुक केलं. त्याने म्हटलं की,”त्याला गोलंदाजी करताना पाहणं खूपच अप्रतिम होतं. तो जवळपास प्रत्येक चेंडू 94 मैल प्रती तास वेगाने टाकत होता आणि स्विंगही करत होता. त्याचा पहिला स्पेल पाहणं म्हणजे खास अनुभव होता. त्याने आपल्या पहिल्याच षटकात विकेट घेतली, हे पाहणं खूपच खास होतं.
ब्रूकने भारतीय संघाच्या पुनरागमन क्षमतेचंही कौतुक केलं. त्याने सांगितलं, भारत एक अत्यंत मजबूत संघ आहे. ते कोणत्याही क्षणी पुनरागमन करू शकतात. हेडिंग्लेमध्ये आपण त्यांना हरवल्यानंतर त्यांनी एजबॅस्टनमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे आता आम्हाला मैदानात आमचा सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
ब्रूकने या संपूर्ण मालिकेत सातत्यपूर्ण खेळी केली आहे. त्याने तीन कसोटी सामन्यांत 314 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे. त्याची सर्वोत्तम खेळी 158 असून सध्या त्याची सरासरी 52.33 आहे.
Comments are closed.