योगेश कदम कुठल्या तोंडानं इथं आलेत, आरोपीला घेऊन या, गाडे सरेंडर व्हायची वाट पाहता का? तृप्ती द
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये मंगळवारी एक 26 वर्षीय तरूणीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्व नेते, मंत्री, पोलिस प्रशासन आता अॅक्शन मोडमध्ये आले असल्याचं दिसून येत आहे. तर या घटनेनंतर अद्याप आरोपी दत्ता गाडे हा फरार आहे. अद्याप त्याला पोलिसांना पकडण्यात यश आलं नाही. पोलिसांनी एकूण तेरा पथकं या आरोपीचा शोध घेत आहेत, त्याला पकडून देण्यासाठी पोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. या घटनेनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस डेपोमध्ये भेट दिली, त्यावेळी त्यांचा ताफा तृप्ती देसांईकडून अडवण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी देसाईंसह अन्य काही महिलांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.
गाडे सरेंडर होण्याची वाट बघता का
तृप्ती देसाई यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक केली जात नाही. लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतलं जातं, 50 तासानंतर योगेश कदम येथे आले आहेत. योगेश कदमांना जाब विचारायता होता, भेटायचा होतं, राज्यात काय चाललंय विचारायचं होतं. विचारून देणार नाहीत म्हणून गाडी अडवली. गाडे सारखा साधा आरोपी सापडत नाही, कसली यंत्रणा आहे, एक लाखाचं बक्षीस जाहीर करता, पोलिसांना लाखो रुपये पगार मिळतो,फुकट मिळतो, पोलीस निष्क्रीय आहेत. राजकीय संबंध कुणाचे आहेत माहिती नाही, राजकीय दबावानं अनेक प्रकरणं दाबली गेली आहेत, संतोष देशमुखांचं प्रकरण आहे वाल्मिक कराडांचं त्यापासून ते आतापर्यंत सगळे आवाज उठवतात कुणाला अटक होत नाही. गाडे सरेंडर होण्याची वाट बघता का. रात्रभर महिला झोपल्या नाहीत, आज सगळ्या महिला आहेत, मुलं मुली आहेत, सगळ्या घाबरत आहेत. एसटी महिला सुरक्षितपणे प्रवास करतात, 50 टक्के प्रवास मोफत मिळतो म्हणून, तिथं पण महिला सुरक्षित नाहीत, असं तृप्ती देसाईंना म्हटलं आहे.
पुणे पोलीस पूर्णपणे अपयशी आहेत
मंत्री योगेश कदमांना लोकांनी निवडून दिलं आहे, लोकशाहीत जाब विचारण्याचा अधिकार आहे. आम्हाला जबरदस्ती सीपी, अॅडिशनल सीपी, कॉन्स्टेबल ओढून आणतात, आरोपीला ओढून आणा, नाही तर आमच्या ताब्यात द्या, आमचा आम्ही निकाल करु, मध्यवर्ती भागातून पोलीस पळून जातो की पळवून लावला जातो. वाल्मिक कराड सरेंडर होणार अशा बातम्या चालल्या होत्या. गृह राज्यमंत्री योगेश कदम इथं आलेत, कुठल्या तोंडानं आलेत, आरोपीला घेऊन या, पुणे पोलिसांचं पूर्ण अपयश आहे, कोयता गँग आहे, गाड्या जळत आहेत, पुणे पोलीस पूर्णपणे अपयशी आहेत, लवकरात लवकर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घ्यावं अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असंही तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे.
पालकमंत्री अजित पवार तुम्ही म्हणता आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, सगळ्यांची तिच मागणी आहे. तुमचं बारामतीचं बसस्थानक कुठं, स्वारगेट बसस्थानक कुठं. अडगळीतील स्थानक कुठं, गाड्या कशा पडलेत, कंडोमचे पाकिट पडलेत, साड्या पडल्यात, मटक्याचे आकडे चालतात, मला वाटतं आतापर्यंत सांगत होतो, मांडत होतो, अशी वेळ आणली की रस्त्यावर उतरायला लागलं,.महिलांबाबत असं घडत असेल तर रस्त्यावर उतरावं लागेल, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.
नराधम दत्तात्रय गाडेला पकडून देणाऱ्याला 1 लाखाचा इनाम
दत्तात्रय रामदास गाडे (36, रा. शिक्रापूर) या सराईत गुन्हेगार आहे, त्याच्यावरती आधी काही गुन्हे दाखल झालेले आहेत. तर दत्ता गाडेला पकडण्यासाठी पोलिसांनी एकूण 13 पथकं शोध घेत आहेत. तर या नराधम फरार आरोपी दत्ता गाडेला पकडून द्या, 1 लाख मिळवा असं बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केलं आहे. स्वारगेट प्रकरणातील आरोपीवर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याला पकडून देणाऱ्याला बक्षीस जाहीर केल्याने त्याला पकडण्यात लवकर यश येण्याची शक्यता आहे. आरोपी दत्ता गाडे याच्यावर आत्तापर्यंत 7 गुन्हे दाखल आहेत. दत्ता गाडे सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांत दाखल आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी 13 पथके तैनात केली असून, त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तसेच तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Comments are closed.