आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही; भारतीय खेळाडूंची माघार, अखेर भारत-पाकिस्तानचा सामना रद्द
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 आयएनडी वि पीएके: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 चा (India vs Pakistan WCL 2025) तिसरा सामना आज (20 जुलै) रोजी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात खेळवण्यात येणार होता. मात्र भारत आणि पाकिस्तानचा हा सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघाच्या अनेक खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला. त्यानंतर आयोजकांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज होणारा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्व प्रिय, pic.twitter.com/viila3zrll
– वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (@Wclleag) 19 जुलै, 2025
हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठण, युसूफ पठाण यांच्यासह भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास थेट नकार दिला. जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या संघासोबत खेळणार नसल्याचे सांगितले. युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये गेला आहे. शाहिद आफ्रिदीला पाकिस्तान संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे, परंतु पहिल्या सामन्यात मोहम्मद हाफीजने पाकिस्तानचे नेतृत्व केले. दरम्यान, गेल्या हंगामात भारतीय संघाने पाकिस्तानला अंतिम फेरीत हरवून जेतेपद जिंकले होते.
🚨 हरभजन सिंग बहिष्कार. 🚨
– पहलगमच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून भोजजीने डब्ल्यूसीएलमध्ये पाकिस्तानच्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. pic.twitter.com/mgkjkuuazc
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 19 जुलै, 2025
🚨 रैना बहिष्कार पाकिस्तान. 🚨
– सुरेश रैनाने डब्ल्यूसीएलमध्ये पाकिस्तान विरुद्ध सामना बहिष्कार केला आहे. (अभिषेक त्रिपाठी). pic.twitter.com/6wzcjzzzsm
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 19 जुलै, 2025
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झाला होता हल्ला-
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे पाकिस्तानच्या पाठिंब्याखालील दहशतवाद्यांनी 26 भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. ही जखम अजूनही भरलेली नाही, पण वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार असल्याच्या बातमीनं भारतीय चाहत्यांमध्ये आक्रोश वाढवला आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने 7 मे रोजी पलटवार केला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओके (पाकिस्तान ताब्यातील काश्मीर) मध्ये घुसखोरी करून अनेक दहशतवादी ठिकाणं नष्ट केली. पाकिस्तानने प्रत्युत्तर दिल्यावर भारतानेही जबरदस्त प्रत्युत्तर दिलं. 7 ते 10 मे दरम्यान भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धा चांगलेच पेटले होते. शेवटी 10 मे रोजी दोन्ही देशांमध्ये तात्पुरता शांती करार झाला. एवढ्या गंभीर घटनांनंतरही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे, याने भारतीय चाहत्यांमध्ये मोठा संताप पसरला आहे.
भारत चॅम्पियन्स संघ: शिखर धवन, रॉबिन उथप्पा (डब्ल्यू), अंबाती रायुडू, गुरकिरत सिंग मान
पाकिस्तान चॅम्पियन्स संघ: कामरान अकमल (डब्ल्यू), शॉर्गेल खान, ओमर अमीन, मोहम्मद हाफिज (सी), शोएब मलिक, आसिफ अली, सोहेब मकसुड, आमेर यमेन, सोहेल तनवीर, सोहेल खान, वहाब रियाज, रम्मन रायस, श्युराझा, श्युराझा, श्युरा. अहमद-आधी आदीदी, अहमद-आधी आदीदी, मिश्रा-आधी, मिश्रा-अहमद सईद अजमल
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.