कृषीमंत्री जुगाराचं पिक पेरण्यात व्यस्त, फडणवीसांनी या मंत्र्यांना घरी बसवावं, मनसेचा हल्लाबोल
मनिक्राव कोकाटे वर यशवंत किलरर: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे. थेट विधिमंडळामध्येच जंगली रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (rohit pawar ) यांनी ट्विट केल्यानंतर माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. या घटनेवरुन सर्वच विरोधी पक्षांकडून कोकाटे यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील कोकाट यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. कृषिमंत्री महाराष्ट्रात जुगाराचं पिक पेरण्यात व्यस्त आहेत. त्यांची फळं महाराष्ट्रातील तरुण पिढी आणि बळीराजा भोगत असल्याची टीका मनसेचे नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले यशवंत किल्लेदार?
कृषीमंत्री महाराष्ट्रात जुगाराचं पिक पेरण्यात व्यस्त आहेत. त्यांची फळं महाराष्ट्रातील तरुण पिढी आणि बळीराजा भोगत आहे. महाराष्ट्र विधानसभेचा बहुमुल्य वेळ मंत्री महोदय सत्कारणी लावताना पाहून राज्याची खूपच प्रगती झाली आहे असे वाटत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लवकरच या मंत्र्यांना आता काम नसल्यामुळं घरी बसवायला हरकत नाही, अशी टीका किल्लेदार यांनी मामिकराव कोकाटे यांच्यावर केली आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पावर?
एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एक करण्याची वेळ आली तर आम्ही भाजप श्रेष्ठींना विचारु, असे वक्तव्य नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil tatkare) यांनी केले होते. यावर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा एक व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर केला आहे. यात माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याचे दिसून येत आहे. सत्तेतल्या राष्ट्रवादीला कुठलीही गोष्ट भाजपला विचारल्याशिवाय करता येत नाही. सध्या राज्यात शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासोबतच राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असून तरीदेखील यांना निर्णय घेता येत नाही. कारण प्रत्येक गोष्ट भाजपला विचारावी लागते. त्यामुळे आता हातात काहीच काम शिल्लक नसल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात बसून रमी खेळत असल्याची खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, जंगली रमी पे आओ ना महाराज! सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
महत्वाच्या बातम्या:
Rohit Pawar on Manikrao Kokate : जंगली रमी पे आओ ना महाराज! राज्यात रोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या अन् कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यस्त; रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा व्हिडीओच केला शेअर
आणखी वाचा
Comments are closed.