Yogesh Kadam information about how many areas police patrolled before Swargate Depo incident
गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी (ता. 27 फेब्रुवारी) स्वारगेट डेपोतील घटनास्थळाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी घटनेच्या काही तास आधी पोलिसांनी किती वेळा डेपो परिसरात गस्त घातली होती. याची माहिती दिली.
पुणे : स्वारगेट बस डेपो येथे मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेच्या 50 तासांनंतर सुद्धा आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे स्वारगेट डेपोबाहेर हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, तरी सुद्धा ही घटना घडली आहे. ज्यामुळे पोलिसांच्या कार्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पण घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्याची गरज नसून पोलिसांनी आपले काम नीट केल्याची माहिती गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. (Yogesh Kadam information about how many areas police patrolled before Swargate Depo incident)
गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी (ता. 27 फेब्रुवारी) स्वारगेट डेपोतील घटनास्थळाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी घटनेच्या काही तास आधी पोलिसांनी किती वेळा डेपो परिसरात गस्त घातली होती. याची माहिती दिली. पत्रकार परिषदेत मंत्री योगेश कदम म्हणाले की, या प्रकरणात पोलिसांनी दुर्लक्ष केले किंवा पोलिसांकडून निष्काळजीपणा झाला असे म्हणता येणार नाही. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य चोख बजावले आहे. एसटी स्टँडच्या आवारात ही घटना घडली. त्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत पोलिसांनी किती वेळा गस्त घातली याची मी माहिती घेतली, असे मंत्री कदम यांनी सांगितले.
हेही वाचा… Pune bus rape : बलात्कार प्रकरणातील आरोपी बड्या राजकीय नेत्याचा कार्यकर्ता, निवडणूकही लढला, पण…
रात्री दीड वाजता पीआयने एसटी स्टँडवर गस्त घातली होती. त्यानंतर पुन्हा रात्री 3 वाजता पीआय गस्त घालून गेले होते. सीसीटीव्हीत हे रेकॉर्ड झालं आहे. पीआय गस्त घालत असल्याचे मी स्वत: पाहिले. सीसीटीव्हीत पीआय दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून दुर्लक्ष झाले असे नाही. ते अलर्ट नव्हते असेही नाही, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली.
तसेच, घटनेच्या पाच तासाच्या अंतरात दोन वेळा पोलिसांनी गस्त घातली होती, असे सांगत मंत्री योगेश कदम म्हणाले की, पोलिसांनी एसटी स्टँडच्या इथे गस्त घातली. पण 24 तास सुरक्षा पुरवण्याचे काम हे एसटी महामंडळ काम करते. एसटी महामंडळाने खासगी एजन्सी हायर केली होती. ही एजन्सी काम करते की नाही हे पाहण्याची जबाबदारी डेपो मॅनेजरची आहे. ही सेक्युरीटी काम करते की नाही हे पाहण्याचे काम एसटी महामंडळाचे होते. आम्ही या मुद्द्यावरून टोलवाटोलवी करत नाही. खासगी सुरक्षा यंत्रणेने व्यवस्थित काम केले असते तर ही घटना घडली नसती. डेपो मॅनेजरने जबाबदारी पार पाडली नाही, असेही मंत्री योगेश कदम यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments are closed.