धाब्यावर जेवणासाठी गेलेल्या 5 मित्रांवर काळाचा घाला, तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

छत्रपती संभाजिनगर अपघात: छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची (Accident) घटना घडली आहे. यात धाब्यावर जेवणासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. शहरतील सिल्लोड रोडवरील ही काल (24 जून) मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडलीय. हा अपघात इतका (Accident News) भीषण होता की यात तीन जण जागीच ठार झालेय. तर दोन जण गंभीर स्वरूपात जखमी आहेत. जखमी तरुणांना नाना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकारणाचा अधिक तपास करत असून कार भरधाव वेगात असल्याने आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला जाऊन धडकली आणि त्यात तिघांचा जागीच अंत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

भरधाव कार डिव्हायडरला धडकली, कारमधील सर्व तरुण 15 ते 18 वर्षांचे

पुढे आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील बिल्डा फाट्याजवळ मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास भरधाव कारने पुलावरील दुभाजकाला धडकल्याने तिघेजण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व पाचही मित्र एका धाब्यावर जेवणासाठी फुलंब्रीला गेले होते. दरम्यान परत येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. भरधाव कार डिव्हायडरला जाऊन धडकल्याने कारमधील तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमी तरुणांना नाना घाटीमध्ये दाखल. धक्कादायक बाब म्हणजे कारमधील सर्व तरुण 15 ते 18 वर्षांचे होते. सध्या पोलीस या अपघातचा तपास करत आहेत.

ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपीला VIP वागणूक; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथून एमडी ड्रग्स तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन वाहने जप्त करून दोन गोदामे सील केली असून तब्बल १ कोटी २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबनभाईला पोलिसांकडून मिळालेली ‘व्हीआयपी’ वागणूक सध्या चांगलीच वादग्रस्त ठरत आहे. दरम्यान, 24 जूनच्या रात्री बबनभाईला वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील एका हॉलमध्ये टेबलावर बसवून, फॅनच्या थंड हवेत, कुटुंबासोबत जेवणाची विशेष व्यवस्था केल्याचं या फोटो मधून दिसते आहे.

पोलिस खात्याची भूमिका संशयास्पद

गुप्त माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली असली तरी मुख्य आरोपीला इतकी सवलत दिली जात असल्याने कारवाईची पारदर्शकता आणि पोलिसांची निष्ठा याबाबत शंका उपस्थित होत आहे. राजकीय दबाव किंवा आर्थिक व्यवहार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हे  ही वाचा

आणखी वाचा

Comments are closed.