‘एपस्टीन फाईल्स’वरून अमेरिकेत गृहकलह, ट्रम्प यांनी अ‍ॅटर्नी जनरल पाम बॉण्डी यांना हटवले!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेसह जगाला हादरवून टाकणाऱया जेफ्री एपस्टीन फाईल्सवरून अमेरिका सरकारमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅटर्नी जनरल पाम बॉण्डी यांची हकालपट्टी केली आहे. सरकारला अपेक्षित पद्धतीने एपस्टीन फाईल्स प्रकरण हाताळण्यात अपयश आल्यामुळे बॉण्डी यांना हटवण्यात आल्याची चर्चा आहे.

बॉण्डी या फ्लोरिडाच्या माजी अ‍ॅटर्नी जनरल असून ट्रम्प यांच्या विश्वासू मानल्या जातात. ट्रम्प यांच्यावर महाभियोग आला असताना ट्रम्प यांच्या बाजूने कायदेशीर लढाई लढण्यात बॉण्डी अग्रेसर होत्या. त्यानंतर त्यांना देशाच्या अ‍ॅटर्नी जनरलपदी बढती मिळाली होती. अॅटर्नी जनरलपदी येताच त्यांनी ट्रम्प यांच्या राजकीय शत्रूंविरोधात चौकशा लावल्या. त्यामुळे सरकारवर सुडाच्या राजकारणाचा आरोप झाला. एपस्टीन फाईल्स खुल्या करण्याची जबाबदारीही बॉण्डी यांच्यावर होती, मात्र हे प्रकरण ट्रम्प हव्या त्या पद्धतीने हाताळणे बॉण्डी यांना जमले नाही. शिवाय, ट्रम्प यांच्या राजकीय टीकाकारांना उत्तर देण्यातही त्या कमी पडत होत्या. त्यामुळे ट्रम्प नाराज होते. त्याची परिणती त्यांच्या हकालपट्टीत झाल्याचे बोलले जाते.

Comments are closed.