अर्शदीप सिंग आशिया कपमध्ये रचणार इतिहास; एक विकेट घेताच होणार खास 'शतक' पूर्ण

आशिया कप 2025 9 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यावेळी ही स्पर्धा टी20 स्वरूपात खेळवली जाईल. आशिया कपमध्ये भारतीय संघ 10 सप्टेंबर रोजी युएईविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला इतिहास रचण्याची संधी असेल. अर्शदीप सिंग हा टी20 स्वरूपात सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे आणि त्याने टी20 मध्ये 99 बळी घेतले आहेत.

जर अर्शदीप सिंगने आगामी आशिया कपमध्ये एक बळी घेतला तर तो टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 बळी घेणारा पहिला भारतीय ठरेल. यासह, तो टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात बळींच्या बाबतीत एक विशेष शतक पूर्ण करेल. आतापर्यंत कोणत्याही भारतीयाला टी-20 मध्ये ही कामगिरी करता आलेली नाही. टी-20 स्वरूपात भारतासाठी सर्वाधिक बळी घेण्याबद्दल बोलायचे झाले तर, अर्शदीप सिंगनंतर युझवेंद्र चहलचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. चहलने 96 विकेट घेतल्या आहेत आणि त्यानंतर हार्दिक पांड्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 94 विकेट आहेत.

भारताकडून टी20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

अरशदीप सिंग 99
युझवेंद्र चहल 96
हार्दिक पांड्या 94
भुवनेश्वर कुमार 90
जसप्रीत बुमराह 89

यासह, अर्शदीप सिंगला आणखी एक इतिहास रचण्याची संधी असेल. जर तो युएई विरुद्ध 100 वा टी20 आंतरराष्ट्रीय विकेट घेण्यास यशस्वी झाला तर तो टी20 आंतरराष्ट्रीय इतिहासात हा विक्रम करणारा सर्वात जलद गोलंदाज बनेल. एकूणच, तो टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण करणारा चौथा जलद गोलंदाज असेल, त्याच्या आधी रशीद खान, संदीप लामिछाने आणि वानिंदू हसरंगा हे सर्वात जलद 100 विकेट घेणारे टॉप-3 गोलंदाज आहेत. अर्शदीप सिंगची टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील आकडेवारी

अर्शदीप सिंगच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 63 सामन्यांमध्ये 18.3 च्या प्रभावी सरासरीने आणि 13.23 च्या स्ट्राईक रेटने 99 विकेट्स घेतल्या आहेत. आता येत्या आशिया कपमध्ये अर्शदीप सिंग कशी कामगिरी करतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.

Comments are closed.