कसोटी मालिकेत मोफत प्रवेशाचा ‘षटकार’, हिंदुस्थान-श्रीलंका कसोटींसाठी स्टेडियमची दारे क्रिकेटप्रेमींसाठी खुली
हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्यातील आगामी दोन कसोटी सामन्यांसाठी श्रीलंका क्रिकेट मंडळाने क्रिकेटप्रेमींना मोठी भेट दिली आहे. 15 ते 19 ऑगस्टदरम्यान गॉल आणि 23 ते 27 ऑगस्टदरम्यान कोलंबो येथे होणाऱ्या दोन्ही कसोटी सामने प्रेक्षकांना पूर्णपणे मोफत पाहता येणार आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या मालिकेला क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे.
श्रीलंका क्रिकेटने अधिकृत निवेदनात देशभरातील क्रिकेटप्रेमी, युवा खेळाडू आणि कुटुंबांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. गॉल कसोटीसाठी प्रेक्षकांना गेट क्रमांक 4, तर कोलंबोतील सिंहलीज स्पोर्टस् क्लब मैदानावर गेट क्रमांक 3, 4, 5 आणि 7 मधून मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
जागतिक कसोटी क्रमवारीत सध्या पाचव्या स्थानावर असलेल्या हिंदुस्थानसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. अंतिम फेरीचे समीकरण मजबूत करण्यासाठी त्यांना सहाव्या क्रमांकावरील श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी करावी लागणार आहे.
Comments are closed.