कुख्यात गुंड बेहलीम याच्यासह 11 जणांना मोक्का

शस्त्रांचा धाक दाखवत बांधकाम व्यावसायिकांकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणारा कुख्यात गुंड झुल्फिकार बेहलीम, याच्यासह 11 साथीदारांविरुद्ध मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-9ने एका बांधकाम व्यावसायिकाकडून 25 लाखांची खंडणी उकळल्या प्रकरणी झुल्फिकार बेहलीम, त्याचा भाऊ मोहसीन बेहलीम तसेच त्यांच्या साथीदारांना पकडले होते. त्यानंतर उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक सचिन पुराणिक व त्यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत अटक आरोपी हे संघटित गुन्हेगारी टोळीचे सक्रिय सदस्य असल्याचे निष्पन्न झाले

Comments are closed.