केरळमध्ये न्यायाधीशाच्या मुलाची जामीन याचिका फेटाळली – TMarathiNews
कोची पोलीस आयुक्तांची उचलबांगडी
कोची : केरळमधील कोची येथे न्यायाधीशाच्या अल्पवयीन मुलाने चालविलेल्या मर्सिडीज कारच्या धडकेत 55 वषीय जयबालकृष्णन यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीची जामीन याचिका फेटाळली. या प्रकरणातील तपासात हलगर्जीपणा झाल्याच्या आरोपांनंतर कोचीचे पोलीस आयुक्त कालीराज महेश यांना पदावरून हटविण्यात आले असून, चार पोलीस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. अपघातानंतर आरोपीला सुऊवातीला जामीन मिळाल्याने मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रŽ उपस्थित केले होते. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली. प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून, अपघाताशी संबंधित सीसीटीव्ही चित्रण आणि अन्य पुराव्यांची तपासणी सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे.
Comments are closed.