चंद्रपूरमध्ये वादळीवाऱ्यासह गारपीट, दुबार पिकांना फटका

चंद्रपूर जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी वादळासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार गारपीटही झाली. प्रामुख्याने बल्लारपूर, राजुरा या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. सोबतच गारपीटही झाली. सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक वातावरण बदलले. दिवसभर तापलेला जिल्हा सायंकाळच्या पावसाने आल्हाददायक झाला. मात्र यामुळे दुबार पिकांना फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. चंद्रपूर शहरातही पावसाने हजेरी लावली.
Comments are closed.