जलपर्णीने उल्हास नदीचा श्वास कोंडला

कचरा, प्लास्टिक बाटल्या, निर्माल्य, गटाराचे सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे रायते पुलाजवळील उल्हास नदीत जलपर्णीने हातपाय पसरल्याने नदीपात्राचा श्वास कोंडला आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असून उल्हास नदीवर जलपर्णीचा गालिचा पसरला आहे. जलपर्णी काढण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची असून प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे. जलशुद्धीकरण केंद्रच नाही उन्हाळा सुरू झाला की उल्हास नदी पात्राला जलपर्णी घट्ट विळखा घालते. यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. उल्हास नदीच्या काठी आपटी, मांजर्ली, भिसोळ, आणे, कांबा, वरप, म्हारळ आदी गावे आहेत. या गावांना रायते पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र २००५ पासून या योजनेला जलशुद्धीकरण केंद्रच नाही. त्यामुळे उल्हास नदीचे पाणी टाकीत सोडण्यात येते. प्रक्रिया न करता पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
Comments are closed.